Home /News /videsh /

COVID-19: 'या' देशात 24 तासांसाठी लागू केला स्मार्ट लॉकडाऊन, असा झाला फायदा

COVID-19: 'या' देशात 24 तासांसाठी लागू केला स्मार्ट लॉकडाऊन, असा झाला फायदा

अनेक देशांना या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. आणि दोन ते तीन महिन्यांहून अधिक काळापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला. मात्र याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला.

अनेक देशांना या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. आणि दोन ते तीन महिन्यांहून अधिक काळापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला. मात्र याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला.

या स्मार्ट लॉकडाऊनमुळं एकूण 3 लाख 8 हजार 600 लोकं प्रभावित झाले. यात विशेष योजना लागू करण्यात आल्या होत्या.

    इस्लामाबाद, 14 जून : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यातच आता काही देशांनी सूट देण्यास सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानमध्ये आता स्मार्ट लॉकडाऊन (Smart Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. पाकमधील 1292 परिसरात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी 24 तासांसाठी स्मार्ट लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल कमांड अॅण्ड ऑपरेशन सेंटर (National Command and Operation Centre) यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. याआधी पंतप्रधन इम्रान खान यांनी सांगितले होते की, देशात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा वाढत आहे. एनसीओसीनं दिलेल्या माहितीनुसार या स्मार्ट लॉकडाऊनमुळं एकूण 3 लाख 8 हजार 600 लोकं प्रभावित झाले. राजधानी इस्लामाबादसह कराचीच्या जी-9/2 आणि G-9/3 मध्ये स्मार्ट लॉकडाऊन लागू केला गेला. फोरमला सांगण्यात आले की राजधानी इस्लामाबादच्या एकूण 10 क्षेत्रांतील 60 हजार 000 लोकसंख्या स्मार्ट लॉकडाउन अंतर्गत आहे. वाचा-धक्कादायक! होम क्वारंटाईन न राहता फिरले शहरभर, 4 कोरोनाबाधित रुग्णांवर गुन्हा या संदर्भात विशेष सूचना देण्यात आल्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, स्मार्ट लॉकडाऊनमध्ये मुख्यत: ट्रॅक, ट्रेस आणि क्वारंटाइन ठेवणं (TTQ) हे धोरण लागू केलं जातं. याशिवाय आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना आणि विशेषत: कार्यस्थळे, औद्योगिक क्षेत्र, वाहतूक, बाजारपेठ आणि दुकाने यांचे पालन करणेही गरजेचे आहेत. वाचा-मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही, अखेर पुरलेले मृतदेह बाहेर काढले आणि... भारतासारखा लॉकडाऊन नाही : इम्रान खान याआधी इम्रान यांनी सांगितले की, 'मला सांगायचे आहे की आमच्यावर कोणताही दबाव नाही आहे. त्याचप्रमाणे आम्ही भारतासारख्या देशांप्रमाणे लॉकडाऊन लागू केलेला नाही. इम्रान म्हणाले की, पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठ, शिकागो विद्यापीठ इत्यादी तज्ञांनी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भारतातील 84 टक्के लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे आणि 34 टक्के कुटुंबे आर्थिक मदतीशिवाय त्यांच्या दैनंदिन गरजा भागवू शकत नाहीत. असेही समजले आहे की 30 दशलक्ष लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत, मात्र कोरोनामुळे श्रीमंत वर्गाला कोणताही त्रास सहन करावा लागला नाही. त्यामुळं पाकिस्तानमध्ये भारतासारखा लॉकडाऊन नाही आहे. वाचा-गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी क्वारंटाइन सेंटरमधून पळाले, 2 तरुणांसोबत काय झालं वाचा संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या