Home /News /videsh /

Covid -19 : रुग्णालयात नाहीये जागा; घर..वाहनं...आणि रस्त्यांवर पडलेत शेकडो मृतदेह

Covid -19 : रुग्णालयात नाहीये जागा; घर..वाहनं...आणि रस्त्यांवर पडलेत शेकडो मृतदेह

कोरोना व्हायरसमुळे जगातील तब्बल 680000 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या व्हायरसने जगातील 80 लाखांहून अधिक लोकांना लागण झाली आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगातील तब्बल 680000 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या व्हायरसने जगातील 80 लाखांहून अधिक लोकांना लागण झाली आहे.

अगदी प्रगत देशांपासून ते गरीब देशांपर्यंत सर्वांनाचा कोरोनाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

    ला पाज, 23 जुलै : दक्षिण अमेरिकेतील बोलविया या देशातील अनेक शहरांमध्ये पोलिसांना घरांमध्ये...वाहनांमध्ये आणि काही प्रकरणात रस्त्यांवर कोविड – 19 चे शेकडो मृतदेह सापडले आहेत. या देशातील शहराच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांची मोठी गर्दी झाली आहे. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोठी कमतरता आहे. रुग्णालयांची दारं बंद आहेत आणि तेथील बोर्डावर लिहिलं आहे की – जागा शिल्लक नाही. हे वाचा-क्वारंटाईन असताना केस कापणं पडलं महागात, बसला इतक्या लाखांचा दंड या आठवड्यात तर अधिक धक्कादायक प्रकरणं समोर आली. याबाबत पोलिसांनी सांगितले की त्यांनी ला पाज आणि बोलवियातील सर्वात मोठे शहर सांता क्रुजमधून 5 दिवसात 420 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. यातील 90 टक्के लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. बोलविया सरकारने कोरोनाच्या संकटाबाबत सांगितले की येथे ऑगस्टपर्यंत कोरोनाचा पीक असेल. हे वाचा-कोरोनाचा धोका : बकरी ईदला बंद राहणार मक्कातील ग्रँड मशीद; हजसाठी अशी होतेय तयारी लॅटिन अमेरिकातील सर्वात गरीब देशांमधील बोलवियामध्ये लोकांमध्ये निराशा वाढत आहे. गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष इवो मोरेल्स या पदावरुन हटविण्यात आल्यानंतर देशातल राजकीय उलाथा-पालथ सुरू आहे. यासाठी सप्टेंबरमध्ये निवडणुका आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. मात्र कोरोनामुळे निवडणुकांबाबत आशंका व्यक्त केली जात आहे. येथे कोरोनाची संख्या इतकी वाढली आहे की मृतांच्या कुटुंबीयांना मृतदेह दफन करण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते. जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अगदी प्रगत देशांपासून ते गरीब देशांपर्यंत सर्वांनाचा कोरोनाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. अद्यापही हा कहर संपलेल्या नाही. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे.यामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या