मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लंडनमुळे जगभरात टेन्शन, 5 देशात नो एन्ट्री; या कारणामुळे वाढली मोदी सरकारची काळजी

लंडनमुळे जगभरात टेन्शन, 5 देशात नो एन्ट्री; या कारणामुळे वाढली मोदी सरकारची काळजी

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार (स्टेन) समोर आला आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठक बोलवली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार (स्टेन) समोर आला आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठक बोलवली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार (स्टेन) समोर आला आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठक बोलवली आहे.

    नवी दिल्ली, 21 डिसेंबर : जगभरात कोरोनाचं धुमशान सुरू आहे. आता कोरोनाच्या बदलत्या रुपामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. ब्रिटनसह युरोपीय देशांनी जगभराची चिंता वाढवली असून 5 देशांमध्ये विमानांना बंदी तर पुन्हा लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली असून मोदी सरकार आणि भारताची देखील चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार (स्टेन) समोर आला आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठक बोलवली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरत असताना त्याचा नवीन रुप समोर आलं आहे. नव्या रुप घेतलेल्या कोरोनावर ताबा मिळवण्यासाठी आता युरोपीय देशांनी उड्डाणं बंद केली आहेत. त्याचसोबत रविवारपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन कठोरपणे केलं जाणार आहे. कोरोनाच्या नव्या रुपाबाबत चर्चा करण्यासाठी जागतिक पातळीवर आरोग्य सेवा महासंचालकांच्या (डीजीएचएस) अध्यक्षतेखाली एक संयुक्त बैठक बोलवण्यात आली आहे. जेएमजीचे सदस्य असलेल्या या बैठकीला भारतातील जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ रॉडरिको एच ऑफ्रिन देखील उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे वाचा-लग्नात कोरोनाचा कहर, नवरी सोडून संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू दक्षिण इंग्लंडमध्ये कोरोनाचं नवीन रूप समोर आलं आहे. त्यानंतर युरोपीय संघाच्या देशांमध्ये ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. तर ब्रिटेनमध्ये रेल्वे सेवा देखील बंद करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे भारतात रिकव्हरी रेट वाढत असून कोरोना हळूहळू आटोक्यात येत असताना हे नवीन संकट समोर उभं ठाकल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात असून मोदी सरकारसमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे. भारतात कोरोनाची लाट ओसरण्यास सुरुवात झाली असली काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, असं आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर याशिवा अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या