Home /News /videsh /

हँड ड्रायरचा वापर पडू शकतो घातक; 'हा' आहे हात कोरडे करण्याचा सुरक्षित मार्ग

हँड ड्रायरचा वापर पडू शकतो घातक; 'हा' आहे हात कोरडे करण्याचा सुरक्षित मार्ग

हँड ड्रायरपेक्षा (Hand Dryer) पेपर टॉवेल (Paper Towel) जास्त परिणाम कारक आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    लंडन, 17 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे (CoronaVirus) बचावासाठी आपण हात धुत (Hand Wash) आहोत मात्र ते कोरडे कसे करत आहोत तेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. हात कोरडे करण्यासाठी आपण घरात कापडी टॉवेल वापरतो, तर घराबाहेर आपण पेपर टॉवेल (Paper Towel) किंवा हँड ड्रायर (Hand Dryer) वापरतो. मात्र हँड ड्रायरचा वापर तुमच्यासह इतरांच्या आरोग्यासाठीही हानीकारक ठरू शकतो. ब्रिटनमधील लिड्स युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यानुसार, जर हात नीट स्वच्छ धुतले गेले नाहीत तर अशावेळी हातावरील जंतू काढून टाकण्यात जेट ड्रायरपेक्षा पेपर टॉवेल प्रभावी आहे.  या अभ्यासात 4 व्यक्तींच्या हातावर घातक असे मायक्रोब्ज सोडण्यात आले. त्यानंतर या व्यक्तींनी हात न धुता हँड ड्रायर किंवा पेपर टॉवेलने कोरडे करण्यास सांगितले. या व्यक्तींनी नंतर डोअर हँडल, फोन अशा वेगवेगळ्या वस्तूंना स्पर्श केला. 'आधी लढा कोरोनाशी' असं म्हणत या पोलिसांनी काय निर्णय घेतला पाहून तुम्ही कराल सला संशोधकांना दिसलं की, हँड ड्रायर आणि पेपर टॉवेल दोघांमुळेही हातांवरील जंतूंचं प्रमाण कमी झालं. मात्र हँड ड्रायरच्या तुलनेत पेपर टॉवेल प्रभावी ठरलं. हँड ड्रायरखाली कोरड्या केलेल्या हातांनी ज्या वस्तूंना स्पर्श केला होता त्याच्यावर पेपर टॉवेलने कोरड्या केलेल्या हातांचा स्पर्श झालेल्या वस्तूंच्या तुलनेत सरासरी 10 पट अधिक जंतू होते. जागतिक आरोग्य संघटनेनेही हात धुतल्यानंतर ते कोरडे करण्यासाठी आणि नळ बंद करण्यासाठी पेपर टॉवेलचा वापर करण्यास सल्ला दिल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. देशातील 60 टक्के लोकांना संसर्ग झाल्यानंतर कोरोनाचा नाश होईल? या महिन्यात पॅरिसमधील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्टीव्ह डिसिसीज (ईसीसीएमआयडी) या युरोपियन परिषदेत हा अभ्यास सादर करण्यात येणार होता. मात्र कोरोनाव्हायरसमुळे ही परिषद रद्द झाली. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या