Home /News /videsh /

कडक सॅल्युट ! कोरोनामुळे पायलटची नोकरी गेली; पठ्ठ्या स्वत:च्या गणवेशात विकतोय नूडल्स

कडक सॅल्युट ! कोरोनामुळे पायलटची नोकरी गेली; पठ्ठ्या स्वत:च्या गणवेशात विकतोय नूडल्स

कोरोनामुळे (Corona)नोकरी गेल्यानंतर पायलटने (Pilot) जिद्द सोडली नाही. पायलटच्या गणवेशात नूडल्स विकणाऱ्या या व्यक्तीचा फूडस्टॉल अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आहे.

    क्वालालंपूर, 12 नोव्हेंबर: कोरोनामुळे (Corona) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. जगभरात अनेक लोकांवर बेरोजगारीचं संकट आलं. नोकरी गमावल्यामुळे काही लोकं हताश झाले. काहींनी आत्महत्या केली. पण असेही काही लोकं आहेत. ज्यांनी आपली जिद्द सोडली नाही पुन्हा एकदा नव्या उमेदीने आव्हानांचा सामना करण्यासाठी ते उभे राहिले. असंच एक उदाहरण आहे, पायलट अजरीन मोहम्मद जाववी यांचं. अजरीन हे मलेशियन पायलट आहेत. कोरोनामुळे त्यांची नोकरी गेली. पण त्यांनी हातपाय गाळले नाहीत. त्यांनी क्वालालंपूरमध्ये स्वत:ची नुडल्स विकण्याची गाडी सुरू केली. विशेष म्हणजे अजरीन गाडीवर काम करताना पायलटचा (Pilot) गणवेश आणि टोपीही घालतात. हे वाचा-केळी खाण्यासाठी हत्तीनं अडवली बस, पुढे काय झालं पाहा VIDEO अजरीन यांनी तब्बल 2 दशकं पायलटची नोकरी केली. आता 44व्या वर्षीही ते दिवसभर उभे राहून नूडल्सची गाडी चालवतात. अजनीन म्हणतात, ‘नोकरी गेल्यामुळे मला पैशांची गरज होती.’ त्यांच्यासोबत त्यांची 4 मुलं आणि बायको राहते. कुटुंबाचा गाडा चालवायचा या हेतूने त्यांनी फूड स्टॉलची सुरूवात केली. अजरीन यांच्या पदार्थांचा चांगला खप होत आहे. पायलटच्या वेशामध्ये ते लोकांना नूडल्स सर्व्ह करतात. त्यांच्या हटके स्टाईलमुळे त्यांच्याकडे अनेक गिऱ्हाईकं येत असतात. त्यांच्या फूड स्टॉलवर आलेले खवय्ये त्यांच्या Kapten Corner चे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यांच्या या फूड स्टॉलला फारच कमी वेळात चांगली प्रसिद्धी मिळाली आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Corona, Food

    पुढील बातम्या