महाभयंकर Coronavirus ला पाहिलंत आता त्याचा आवाजही ऐका

महाभयंकर Coronavirus ला पाहिलंत आता त्याचा आवाजही ऐका

कोरोनाव्हायरसच्या रचनेपासून शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसचं संगीत (coronavirus music) तयार केलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 07 एप्रिल : कोरोनाव्हायरस (Coronavirus) नेमका दिसतो कसा हे तुम्ही पाहिलं आहे. महाभयंकर व्हायरसचे अनेक फोटो तुम्ही पाहिलेत. मात्र तुम्ही त्याचा आवाज ऐकला आहे का? नाही ना. आता तुम्ही कोरोनाव्हायरसचा आवाजही ऐकू शकणार आहात. कोरोनाव्हायरसच्या रचनेपासून शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसचं संगीत (coronavirus music) तयार केलं आहे.

सोनीफिकेशन तंत्रज्ञानामार्फत कोरोनाव्हायरस म्युझिक तयार करण्यात आलं आहे. कोरोनाच्या काटेदार प्रोटीनपासून हे संगीत तयार करण्यात आलं आहे. तब्बल 1 तास 49 मिनिटं 48 सेकंदाचं हे संगीत आहे. यामध्ये तुम्हाला घंटी, स्ट्रिंग्स आणि बासरीचा आवाज ऐकायला येईल.

व्हायरसमधून आवाज कसा येतो?

कोरोनाव्हायरसच्या वर जे काटेदार प्रोटीन असतात ते amino acid पासून बनलेले असतात. प्रत्यक्षात या amino acid ची रचना पाहिल्यास तो आपल्या डीएनएच्या आकारासारखा असतो. ज्यावेळी यामध्ये कंपन होतं तेव्हा त्यातून आवाज येतो आणि याच आवाजाला शास्त्रज्ञांनी संगीताचं रूप दिलं आहे.

उपचार शोधण्यासाठी होणार फायदा

व्हायरसची अशी रचना तयार करणं याला वैज्ञानिक भाषेत मॉलिक्यूलर मॉडलिंग म्हणतात. मॉलिक्युलर मॉडेलचं सोनिफिकेशन केलं जातं तेव्हा त्यातून संगीत निघतं. शास्त्रज्ञांनी या सोनिफाइड प्रोटीनला आपल्या डेटाबेसमध्ये टाकलं आहे, जेणेकरून या प्रोटीनसह डेटाबेसमधील इतर कोणता प्रोटीन प्रतिक्रिया देतो याची माहिती मिळवता येईल. डेटाबेसमधील जो प्रोटीन कोरोनाच्या सोनिफाइड प्रोटीनला दाबेल त्या प्रोटीनपासून या व्हायरसला मारण्याचं औषध तयार केलं जाईल.

संकलन, संपादन - प्रिया लाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2020 10:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading