वॉशिंग्टन, 01 जुलै : जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. अमेरिकेत सर्वात जास्त कोरोनाबाधित असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. यातच आता अमेरिकन वैज्ञानिक आणि कोरोना तज्ज्ञ डॉक्टर अॅंथनी फॉसी (Dr. Anthony Fauci) यांनी असा इशारा दिला आहे की जर लोकं सुधारले नाहीत तर कोरोनाव्हायरस आणखी थैमान घालेल. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात अमेरिका अपयशी ठरलं आहे आणि त्यावर मात कशी करावी, हा एक प्रश्न आहे. फॉसी म्हणाले की, जर लोक मास्क घालून सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास अमेरिकेत दररोज 1 लाख नवीन रुग्ण सापडण्याची शक्यता आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅण्ड इन्फेक्टीव्ह डिसिसीजच्या हेड फॉसी यांनी असा इशारा दिला आहे की अमेरिकेत पुन्हा गोष्टी बिघडत चालल्या आहेत आणि जर लवकरात लवकर पाऊले उचलली गेली नाहीत तर ती परिस्थिती हाताबाहेर जाईल. ते म्हणाले की, लोकांना मास्क घालावे लागतील आणि सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करावे लागेल. खबरदारी घेतली गेली नाही तर येत्या काळात अमेरिकेत दररोज एक लाखांहून अधिक केसेस येतील यात शंका नाही.
वाचा-एकाच खड्ड्यात पुरले तब्बल 8 कोरोनाबाधितांचे मृतदेह, धक्कादायक VIDEO VIRAL
फॉसी म्हणाले की, पुढील वर्षीपर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होईल अशी त्यांना आशा आहे, परंतु त्याआधी बरीच आपत्ती उद्भवू शकते. न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीनंतर आता कॅलिफोर्निया, टेक्सास आणि अॅरिझोना ही संक्रमणाची नवीन केंद्रे म्हणून उदयास आली आहेत.
अमेरिकेत कोरोनावर नियंत्रण नाही
फॉसी असेही म्हणाले की,कोरोना रोखण्यावर अमेरिकेचा ताबा सुटला हे स्पष्ट आहे. ते म्हणाले की ही सर्वात वाईट परिस्थिती आहे की आपल्याला पुढे काय होणार आहे हे माहित नाही, परंतु परिस्थिती अशीच राहिली तर एक अतिशय वाईट काळ येईल. फॉसी म्हणाले की, दररोज 40 हजाराहून अधिक संसर्ग होण्याचे प्रकार घडत आहेत, जर हे असेच राहिले तर दिवसात ते 1 लाखांपर्यंत वाढू शकते.
वाचा-सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आता 'हे' टेडिबिअर करणार मदत