कोरोनावर चीन करतंय कमाई, 3500 कोटींची खराब उपकरणे आणि मास्क केले निर्यात

कोरोनावर चीन करतंय कमाई, 3500 कोटींची खराब उपकरणे आणि मास्क केले निर्यात

चीनमधून आलेल्या या विषाणून धुमशान घातले असताना, चीनमध्ये मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. एवढेच नाही तर चीनने व्यापारासही सुरुवात केली आहे.

  • Share this:

बिजींग, 30 मार्च : जगात कोरोना विषाणूंमुळे दहशत पसरली आहे. 180 देशांमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाच्या चाचणी किट आणि मास्कची कमतरता सध्या सर्व देशांना भासत आहे. एकीकडे चीनमधून आलेल्या या विषाणून धुमशान घातले असताना, चीनमध्ये मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. एवढेच नाही तर चीनने व्यापारासही सुरुवात केली आहे. नफा मिळवण्यासाठी चीन सध्या अनेक देशांना कोरोना चाचणी किट निर्यात करत आहे. मात्र ही चीनने निर्यात केलेली सर्व वैद्यकिय उपकरणे खराब असल्याचे समोर आले आहे. नेदरलँड आणि स्पेनमध्ये चीनने सदोष वैद्यकीय उपकरणे परत केली असल्याचे सांगितले जात आहे.

नेदरलँडने चीनकडून 6 लाख मास्क आयात केले होते. मात्र सर्व मास्क नेदरलॅंडने परत केले आहेत.चिनी वृत्तपत्र पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार, नेदरलँडमधील चिनी दूतावासाने नेदरलँड सरकारकडे संपर्क साधून हे प्रकरण लवकरच सोडवण्यास सांगितले आहे. तर, स्पेननेही चिनी कंपनीला सदोष कोरोना व्हायरस टेस्ट किट परत केले आहेत. युरोपियन बाजारपेठेत चीन सध्या व्यापार करत आहे, यातून आपल्या नुकसानाची भरपाई करण्याचा चीनचा प्लॅन असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

वाचा-Fact check - भरपूर पाणी प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो?

स्पेनला चाचणी किट देणाऱ्या Shenzhen Bioeasy कंपनीने किट वापरायची कशी हे त्यांना माहित नसल्याची सबब दिली आहे. स्पॅनिश सरकारने असे म्हटले आहे की चाचणी किटमुळे चुकीचे निकाल येत आहेत. त्यामुळं या सर्व किट परत करणार आहेत.

3518 कोटींची वैद्यकिय उपकरणे चीनने विकली

यापूर्वी स्पेनचे आरोग्यमंत्री साल्वाडोर इला म्हणाले की सुमारे 3518 कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे चीनकडून खरेदी करण्यात आली आहेत. यात 950 व्हेंटिलेटर, 5.5 लाख चाचणी किट, 10 लाख मास्क यांचा समावेश आहे. एकीकडे जगाची अर्थव्यवस्था कोलमडली असताना चीन मात्र याचा फायदा घेताना दिसत आहे. अमेरिका, ब्रिटन, स्पेन, इटलीसह अनेक देशांमध्ये भयंकर कोरोना विषाणूचा साथीचा प्रादुर्भाव झाला आहे. इतर देशांमध्येही हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे.

वाचा-कोरोनामुळे जनता संकटात, अन् राजा 24 महिलांना घेऊन झाला फरार

जगात कोरोनाचा हाहाकार

जगभरात कोरोना व्हायरसमुळे तब्बल 33 हजार 976 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त इटली 10 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीनंतर अमेरिकेतही कोरोनाचा धोका वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचा सर्वात जास्त धोका आहे. मागच्या तीन दिवसांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत तीनपटीनं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 19 राज्यांमध्ये सरासरी 1 हजार रुग्ण आढळले असल्याची माहिती मिळते.

वाचा-'भारताला 21 नाही तर 49 दिवसांचा लॉकडाऊन वाचवू शकतो', तज्ज्ञांचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2020 02:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading