नवी दिल्ली, 03 ऑगस्ट: चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाची भीती आता लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना आहे. कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट धुवून आणि सॅनिटाइझ करून घ्या असं सातत्यानं सांगितलं जातं. बऱ्याचदा नाणी आणि नोटा (पैसे) यांची देवाण घेवाण करताना त्यावरही कोरोनाचे विषाणू असू शकतात किंवा लपू शकतात असं डोक्यात आल्यावर आपण घाबरून जाऊ आणि सॅनिटाइझ करू. पण एका तरुणानं चक्क 14 लाख रुपये धुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दक्षिण कोरियातील अंसन शहरात एका व्यक्तीनं कोरोनाच्या भीतीमुळे आपले सगळे पैसे नोटांवरील विषाणू घालवण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये टाकले. साधारण 14 लाख रुपये मशीनमधून धुवून काढले. ओल्या झालेल्या नोटा सुकवण्यासाठी आणि निर्जंतूक करण्यासाठीही त्यानं पुढे भन्नाट युक्ती वापरली.
हे वाचा-गावापर्यंत पोहोचली नाही रुग्णवाहिका, गर्भवतीला टोपलीत बसवून केली नदी पार
हे सगळे भिजलेले 14 लाख रुपये वाळवण्याठी त्यानं ओव्हनची मदत घेतली. नोटा सुकवण्याच्या नादात त्यातल्या काही नोटा जळून गेल्या. या तरुणानं निर्जंतुकरणासाठी वापलेली पद्धत पाहून सर्वच हैरण झाले. तिथल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार नोटांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या व्यक्तीनं ज्यानंतर या नोटा नव्या बिलेंसाठी बदलता येतील की नाही हे शोधण्यासाठी त्या व्यक्तीने बँक ऑफ कोरियाला भेट दिली. बँक ऑफ कोरियाने सांगितले की खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण नियमांतून केली जाऊ शकते. त्यानंतर बँक ऑफ कोरियाने त्या व्यक्तीला नियमांनुसार 23 मिलियन डॉलर (19,320 डॉलर)चं नवीन चलन मंजूर केलं आहे.
तरुणानं केलेल्या या अजब कारभाराची जगभरात चर्चा होत आहे. या तरुणानं चक्क वॉशिंग मशीनमधून 14 लाख रुपये धुवून काढल्यानं त्याच्या अजब करामतीची चर्चा होतेय.