S M L

'मी भारतात कधी जायचं हे न्यायालयच ठरवेल'

'मी भारतात कधी जायचं हे न्यायालयच ठरवेल', हे उद्गार आहेत भारताला कोट्यवधीचा चुना लावून पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याचे.

Updated On: Sep 8, 2018 06:54 PM IST

'मी भारतात कधी जायचं हे न्यायालयच ठरवेल'

लंडन, 8 सप्टेंबर :'मी भारतात कधी जायचं हे न्यायालयच ठरवेल', हे उद्गार आहेत भारताला कोट्यवधीचा चुना लावून पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याचे. लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेला सामना पाहण्यासाठी शुक्रवारी विजय मल्ल्या स्टेडियममध्ये पोहोचला. सामन्यानंतर 'एएनआय' या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने विजय मल्ल्याला तो भारतात कधी परतणार असा प्रश्न विचारला. यावर विजय मल्ल्या म्हणाला, मी भारतात कधी परतायचे हे न्यायालयच ठरवेल. याबाबत त्याने अधिक भाष्य करणे टाळले. मी इथे मुलाखत द्यायला आलो नाही, असे सांगून विजय मल्ल्या कारमधून निघून गेला.

खास विजय मल्ल्यासाठी सज्ज आहे आर्थर रोड तुरूंग

विजय मल्ल्याने आर्थर रोड योग्य त्या सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयनं लंडन कोर्टात कारागृहाचा व्हिडीओ सादर केला. आठ मिनिटांच्या या व्हिडीओत विजय मल्ल्याचे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. मल्ल्याने कारागृहात उजेड किंवा पाणी नसल्याची तक्रार केली होती.

यानंतर लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जज एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार हा व्हिडीओ सादर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ मध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी मुबलक जागा असून तिथे आराम करण्याचीही व्यवस्था असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यासोबतच बराकमध्ये खासगी शौचालय, टीव्ही आहे. मल्ल्याला रोज स्वच्छ चादरी आणि उशा दिल्या जातील.

विजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आहे. आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन न्यायालयात दिली होती. विजय मल्ल्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं.

Loading...
Loading...

मुंबईतील सर्वात सुरक्षित असणाऱ्या आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ चा व्हिडीओ शूट करुन अधिकारी त्याची सविस्तर माहिती देण्याची ही पहिलीच वेळ होती. आर्थर रोड कारागृहातील सुरक्षा आंतरराष्ट्रीय दर्जाची असून सगळीकडे सीसीटीव्ही आहेत. याशिवाय कारागृहात आणि बाहेर दोन्हीकडे सुरक्षारक्षक तैनात असतात.

२ मार्च २०१७ ला विजय मल्ल्या दुपारी १.३० वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली लंडन '९W १२२' विमानाने रवाना झाला होता. विजय मल्ल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.

  VIDEO : स्टार जातीच्या ५२३ कासवांची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2018 06:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close