• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • Discount च्या हव्यासामुळे Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना; सात वर्षे तुरुंगवासाचीही शक्यता

Discount च्या हव्यासामुळे Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना; सात वर्षे तुरुंगवासाचीही शक्यता

छोटासा मोहदेखील कसा धोकादायक ठरू शकतो याचं हे चांगलं उदाहरण आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 22 सप्टेंबर : एखादी गोष्ट मोफत किंवा सवलतीत मिळणार म्हटलं की, अनेक लोक त्याचा फायदा घेण्यासाठी धावतात. आपल्या देशात आपण अनेकदा बघतो की सेल लागला किंवा काही सवलत जाहीर झाली की तिथं लोकांची गर्दी उसळते; पण भारतातच असं चित्र दिसतं असं नाही; तर जगभरात सर्वत्र ही मानवी प्रवृत्ती सारखीच असल्याचं आढळतं. अनेकदा असा हव्यास अत्यंत घातक ठरतो. याचं एक उदाहरण नुकतंच अमेरिकेत (America) दिसलं आहे. अमेरिकेत एका व्यक्तीला सवलतीच्या दरातील कोल्ड ड्रिंकची (Cold Drink) बाटली थोड्याशा चुकीमुळे तब्बल 36 लाखांना पडली असून, सात वर्षांच्या तुरुंगवासाची (Jail) शिक्षाही भोगावी लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया इथं राहणाऱ्या 38 वर्षीय जोसेफ सोबोलेव्स्की (Joseph Sobolewski) यानं 23 ऑगस्ट रोजी एका दुकानातून कोल्ड ड्रिंकची (Cold Drink) एक बाटली विकत घेतली. त्या दुकानात कोल्ड ड्रिंकच्या दोन बाटल्या घेतल्यास त्या 3 डॉलर्समध्ये दिल्या जातील, असा बोर्ड लावण्यात आला होता. जोसेफ सोबोलेव्स्की यानं तो बोर्ड बघितला आणि त्यानुसार एका बाटलीसाठी दीड डॉलर्स अशी किंमत गृहीत धरली. त्यानुसार त्यानं काउंटरवर 2 डॉलर्स दिले आणि तो निघून गेला. विमानाने प्रवास करताय, 'ही' बटणं तुम्हाला माहिती आहेत का? मात्र दोन बाटल्या विकत घेतल्या तरच ही ऑफर मिळणार होती. अन्यथा एका बाटलीची किंमत 2.29 डॉलर्स होती. त्यामुळे सोबोलेव्स्की यानं 43 सेंट कमी दिले असल्याचं तिथल्या कॅशिअरच्या लक्षात येताच ती त्याच्यामागे धावली;पण तोपर्यंत तो आपल्या कारमध्ये बसून निघून गेला होता. कॅशिअरने ताबडतोब पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर पेनसिल्व्हेनिया पोलिसांनी (Police) जोसेफ सोबोलेव्स्कीला पैसे कमी दिल्याच्या आरोपावरून अटक केली. न्यायालयात (Court) या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयानं सोबोलेव्स्कीला तब्बल 50 हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे 36 लाख रुपयांचा दंड (Penalty) ठोठावला. तसंच या प्रकरणात जोसेफ दोषी आढळल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. केवळ 43 सेंट कमी दिल्याबद्दल इतका मोठा दंड हे जरा आश्चर्यकारक वाटतं ना? पण न्यायालयानं जोसेफची पूर्वापीठिका चोरीची असल्यानं एवढा दंड केला असल्याचं सांगितलं. जोसेफ सोबोलेव्स्कीचा अशा प्रकारचा हा तिसरा गुन्हा होता. त्यानं याआधीही दोन वेळा अशी चोरी केली होती. 10 वर्षांपूर्वीही त्यानं आपल्या कारमध्ये गॅस भरला आणि पैसे न देता तो निघून गेला होता. तर 2011 मध्ये त्यानं एका दुकानातून चपलांचे जोड चोरले होते. त्यासाठी त्याला 7 वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला आहे. तरीही त्याची ही प्रवृत्ती कमी झाली नसल्याचं या घटनेवरून सिद्ध झाल्यानं न्यायालयानं त्याला हा इतका मोठा दंड ठोठावल्याचे नमूद केलं आहे. अल्पवयीन मुलाने केली आई, वडील, बहीण आणि कुत्र्यांचीही हत्या दरम्यान, दंडाची ही एवढी मोठी रक्कम भरणं शक्य नसल्याचं जोसेफ सोबोलेव्स्कीनं म्हटलं असून, न्यायालयानं इतक्या किरकोळ गुन्ह्यासाठी एवढी कठोर शिक्षा देऊ नये अशी याचना केली आहे. त्यावर आता न्यायालय काय निर्णय देते ते बघावे लागेल. छोटासा मोहदेखील कसा धोकादायक ठरू शकतो याचं हे चांगलं उदाहरण आहे. त्यामुळं आतातरी जोसेफ सोबोलेव्स्की आणि त्याच्यासारखे सवलतीच्या मागे धावणारे लोक यातून धडा घेतील अशी अपेक्षा आहे.
  First published: