अंटार्टिकात झालं अनोखं शुभमंगल

अंटार्टिकात झालं अनोखं शुभमंगल

ज्युली बॉम आणि टॉम सेल्व्हेस्टर या तरूणांनी अंटार्टिकावर लग्न करून नवा विक्रम नोंदवलाय.

  • Share this:

20 जुलै : हाडं गोठवणारी थंडी. बोचरा वारा. जिकडे पाहावे तिकडे बर्फ. हे वातावरण आहे अंटार्टिकाचं. अशा वातावरणात कुणी लग्नाची कल्पानाही करू शकत नाही. मात्र ज्युली बॉम आणि टॉम सेल्व्हेस्टर या तरूणांनी अंटार्टिकावर लग्न करून नवा विक्रम नोंदवलाय.

अशा प्रकारचं हे पहिलंच लग्न आहे. टॉम आणि ज्युली हे दोघही ब्रिटनचे नागरिक असून ते एका संशोधन संस्थेत काम करतात.अंटार्टिकावरच हे दोघंही प्रेमात पडले आणि जिथं प्रेम बहरलं तिथेच त्यांनी लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि निवडक मित्रांच्या उपस्थितीत लग्नही केलं.

सध्या जगभर सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2017 01:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading