बाप रे! तोंडाऐवजी गुप्तांगावर मास्क लावून बाजारात फिरला तरुण, PHOTO VIRAL

बाप रे! तोंडाऐवजी गुप्तांगावर मास्क लावून बाजारात फिरला तरुण, PHOTO VIRAL

हा तरुण अशा विचित्र पद्धतीनं बाजारात फिरत असल्यानं लोक आश्चर्यचकीत होऊन हा सगळा प्रकार पाहात होते.

  • Share this:

लंडन, 25 जुलै: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं जगभरात मास्क सक्तीचा केला जात आहे. मास्क न वापरणाऱ्यांना तुरुंगवास किंवा मोठा दंडाची शिक्षाही अनेक शहरांनी ठोठावली आहे. अशातच सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. सेंट्रल लंडन इथल्या लोकप्रिय असलेल्या बाजारात एक व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याचं पाहायला मिळालं. विचित्र प्रकार म्हणजे या तरुणानं तोंडावर मास्क वापरण्याऐवजी गुप्तांगावर मास्क लावून फिरत होता.

हा तरुण अशा विचित्र पद्धतीनं बाजारात फिरत असल्यानं लोक आश्चर्यचकीत होऊन हा सगळा प्रकार पाहात होते. दुकानांमध्ये विनामास्क येण्यासाठी बंदी आहे. याशिवाय सगळीकडे मास्क वापरणं सक्तीचं असल्यानं या तरुणानं मास्क थोड्या वेगळ्या पद्धतीनं वापरल्यानं चर्चेचा विषय बनला आहे.

या तरुणानं आपल्या गुप्तांगावर हलक्या निळ्या रंगाचा मास्क लावला आहे. हा तरुणा बाजारातून फिरत असताना तिथल्या काही लोकांनी त्याचे फोटो काढून व्हायरल केले तर काही लोक त्याच्याकडे रागाने पाहात होते. हा तरुण असा अर्धनग्न अवस्थेत का फिरत आहे? त्याने मास्कचा वापर असा का केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र या तरुणाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जगभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. या व्हायरचे विषाणू खूप वेगळ्या पद्धतीनं आपलं रुप सातत्यानं बदलत असल्याची माहिती मिळत आहे. एका रिसर्चदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग कानावाटेही काही रुग्णांना झाला आहे. कानाच्या हाडांना यामुळे त्रास होऊ शकतो असंही अभ्यासातून समोर आलं आहे.

मेडिकल जर्नल जामा ऑटोलरींगोलॉजीमध्ये प्रसारित झालेल्या माहितीच्या आधारे कानात कोरोनाचा संसर्ग झाल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या विषाणूंमुळे या तीन रुग्णांच्या कानातील हाडांवर त्याचा मोठा परिणाम झाल्याची माहिती या रिसर्चमधून समोर आली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 25, 2020, 10:31 AM IST

ताज्या बातम्या