न्यूयॉर्क 23 मार्च : महाभयंकर कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलं आहे. या व्हायरस विरुद्ध अद्याप औषध मिळालं नसल्याने त्याला आटोक्यात आणता येणं शक्य नव्हतं. त्यावर जगभर संशोधन सुरू आहे. अमेरिकेतल्या एका औषध निर्माण कंपनीने यावर औषध शोधलं असा दावा केलाय. Moderna Therapeutics असं या कंपनीचं नाव आहे. अमेरिकेच्या National Institutes of Health (NIH) च्या मदतीने त्यांनी गेली तीन महिने यावर संशोधन केलं आहे.या लसीच्या प्रयोगांना सुरुवात झाली असून पहिल्यांदा 45 जणांवर हा प्रयोग करण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती करण्याची तयारीही या कंपनीने केलीय. याबाबतचं वृत्त जगविख्यात ‘Time’ मासिकाच्या वेबसाईटने दिलं आहे.
कोरोनावरच्या लसीची निर्मिती केल्यानंतर आता माणसांवर त्याचे प्रयोग होत आहेत. त्यासाठी निवडण्यात आलेले 45 स्वयंसेवक हे कुठलाही आजार नसलेले आहेत. त्यांना लस दिल्यानंतर त्याचे काही परिणाम होतात का? काही दुष्परिणाम होतात का? याचा अभ्यास करण्यात येणार आहे. नंतर दुसऱ्या टप्प्यातल्या चाचणीसाठी 100 जणांवर प्रयोग करण्यात येईल. यासगळ्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असं मत कंपनीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
हा प्रयोग यशस्वी झाला तर त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची तयाराही कंपनीने केली आहे.
जगभरात 3 लाखांपेक्षा जास्त लोकं कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) विळख्यात आहेत, तर या व्हायरसने 13 हजार लोकांचा बळी घेतला आहे. या व्हायरसला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत, आवश्यक ती पावलं उचलत आहेत. उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर करून डॉक्टर उपचार करत आहे, तर दुसरीकडे या व्हायरसला रोखेल अशी लस (vaccine) शोधण्यासाठी शास्त्रज्ञांची धडपड सुरू आहे.
Coronavirus हवेतून पसरू शकतो? WHO ने केलं सावध, काय सांगतं संशोधन?
जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization - WHO) जगभरात कोरोनाव्हायरसविरोधात कमीत कमी 20 लस विकसित झालेल्या असल्याचं म्हटलं आहे. त्यापैकी काही लसींचं ह्युमन ट्रायलही सुरू झालं आहे.
As first COVID-19 vaccine starts human testing, company prepares to make more doses https://t.co/LkOYwJdinN
— TIME (@TIME) March 23, 2020
मात्र या लसी खरंच यशस्वी आणि सुरक्षित असल्याची खात्री झाल्यापासून त्याला परवानगी मिळण्यासाठी किमान 18 महिने लागतील. म्हणजे दीड वर्षांनीच कोरोनाव्हायरसविरोधातील लस उपलब्ध होईल.