गूड न्यूज! कोरोनाची एक लस ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात, दुसरी 99% प्रभावी

गूड न्यूज! कोरोनाची एक लस ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात, दुसरी 99% प्रभावी

कोरोनाविरोधी लस (coronavirus vaccine) विकसित करण्याच्या शर्यतीत दोन कंपन्या सर्वात पुढे आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जून : जगभरात जवळपास 100 पेक्षा जास्त औषध कंपन्या कोरोनाव्हायरसविरोधातील (coronanvirus) लस (vaccine) तयार करत आहेत. यातील 2 कंपन्यांकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. अमेरिका (america) आणि चीनमधील (china) औषध कंपन्यांची लस परिणामकारक ठरत असल्याचं दिसून आलं आहे. अमेरिकेतील एका कंपनीची लस ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे तर चीनमधील कंपनीने आपली लस 99 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.

कोरोनाविरोधातील लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. लस बनवण्याच्या शर्यतीत शेकडो कंपन्या आहेत. या शर्यतीत दोन कंपन्या सर्वात पुढे आहेत.

चीनी कंपनी सिनोवॅक बायोटेकने (Sinovac Biotech) कंपनीने तयार केलेल्या लसीचं जवळपास एक हजारपेक्षा जास्त लोकांवर ट्रायल सुरू आहे. आता या लसीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल ब्रिटनमध्ये केलं जाणार आहे. त्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं आहे. शास्त्रज्ञांनी ही लस 99 टक्के प्रभावी ठरेल असा दावा केला आहे. कंपनी बीजिंगमध्ये एक प्लांट तयार करत आहे, जिथं जवळपास दहा कोटींपेक्षा जास्त डोस तयार केले जातील. कोरोनाव्हायरसचा जास्त धोका असलेल्या रुग्णांवर सर्वात आधी याचा प्रयोग होणार आहे.

हे वाचा - आता लहान मुलांवरही होणार कोरोनाच्या लसीची चाचणी? पालकांनी घेतला धसका

तर अमेरिकेतील मॉडर्ना इंक डॉट (Moderna Inc.) कंपनीने आपल्या लसीचं पहिलं ट्रायल यशस्वी झाल्याचं सांगितलं आहे. या लसीमुळे शरीरात अँटिबॉडीज तयार होत आहेत. लसीचं ट्रायल वेगवेगळ्या स्तरावर होत आहे. सिएटलमध्ये 45 निरोगी व्यक्तींवर या लसीचं परीक्षण करण्यात आलं त्यावेळी त्यांना कमी मात्रेचे 2 शॉट्स देण्यात आले आणि त्यावेळी त्यांच्या शरीरात कोरोनाविरोधात लढणारी अँटिबॉडीज दिसून आल्या.

हे वाचा - कोरोनावरील उपचारासाठी 'हे' औषध धोकादायक, मृतांची संख्या आणखी वाढेल; WHOचा इशारा

First published: June 2, 2020, 4:22 PM IST

ताज्या बातम्या