शाळा-कॉलेज सुरू होताच 'या' देशात कोरोनाचा विस्फोट! 200 विद्यार्थी पॉझिटिव्ह, 2000 क्वारंटाइन

शाळा-कॉलेज सुरू होताच 'या' देशात कोरोनाचा विस्फोट! 200 विद्यार्थी पॉझिटिव्ह, 2000 क्वारंटाइन

काही देशांनी शाळा-कॉलेज सुरू करण्यास सांगितले. यामुळे कोरोना उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 19 ऑगस्ट : जगभरात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अशा परिस्थितीतही काही देशांनी शाळा-कॉलेज सुरू करण्यास सांगितले. यामुळे कोरोना उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे सगळ्यात जास्त प्रभावित झालेल्या अमेरिकेत (US) ट्रम्प प्रशासनानं शाळा-कॉलेजं सुरू केल्यानंतर कोरोनाचा विस्फोट झाला आहे. येथील एकूण 6 विद्यापाठीतील जवळजवळ 200 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) असून 2000 विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

अमेरिकेतील एकट्या आयोवा विद्यापीठात (University of Iowa) सर्वाधिक 175 विद्यार्थी संक्रमित झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर नॉट्रेडम युनिव्हर्सिटी आहे, येथील 80 हून अधिक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. जॉर्जियाच्या चेरोकी काउंटी स्कूलमधील सर्वाधिक 1100 मुलांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. अमेरिकेत 3 ऑगस्ट रोजी शाळा व महाविद्यालये पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात आली, त्यानंतर कोरोना संक्रमणाची प्रकरणे सतत वाढत आहेत.

वाचा-भारतात लॉंच झालं सर्वात स्वस्त Favipiravir औषध, जाणून घ्या एका टॅबलेटची किंमत

दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एकट्या अमेरिकेत कोरोना संसर्गाची प्रकरणे एक कोटी 15 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे. एवढेच नव्हे तर चार लाख लोकांचा मृत्यू होण्याचीही शक्यता आहे.

वाचा-देशात 20 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात! वाचा 24 तासांतील लेटेस्ट आकडेवारी

20-40 वयोगटात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त

WHOने दिलेल्या निवेदतानत असे सांगण्यात आले आहे की, 20 ते 40 वर्षे वयोगटातील मुले जगभरात कोरोना संसर्ग पसरवत आहेत, त्यांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. WHOमहासंचालक टेड्रस अ‍ॅड्नॉम गॅब्रियासिस यांनी सांगितले की, "तरुणांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा सर्वात जास्त धोका आहे. इंग्लंड ते जपान आणि जर्मनी ते ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये वाढ होण्यासाठी तरुणांना जबाबदार धरले जाते. बरेच अधिकारी म्हणतात की या काळातील लोक लॉकडाऊनमध्ये कंटाळले आहेत, म्हणून आता ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता बाहेर जात आहे.

वाचा-कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी निश्चिंत राहू नका! रुग्णांमध्ये दिसली लक्षणं

कोरोना प्रभावित टॉप-10 देश

जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या 24 तासांत जगातील 213 देशात 2.50 लाख नवीन रुग्ण सापडले तर, 6287 रुग्णांचा मृत्यू झाला. जगभरात आतापर्यंत 2.22 कोटी नवीन रुग्ण सापडले आहेत. वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 56 लाखाहून अधिक लोकांचा येथे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 43 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत आणि 1358 लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी, ब्राझीलमध्ये 24 तासांत 48 हजार प्रकरणे झाली आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: August 19, 2020, 1:36 PM IST

ताज्या बातम्या