कोरोनामुळे पाकमध्ये तरुण डॉक्टराचा मृत्यू, सहकारी म्हणाले, 'चांगले मास्क तरी द्यायचे...'

कोरोनामुळे पाकमध्ये तरुण डॉक्टराचा मृत्यू, सहकारी म्हणाले, 'चांगले मास्क तरी द्यायचे...'

सरकारने जर योग्य मास्क आणि इतर साधनं दिली असती तर त्याचा जीव वाचला असता.

  • Share this:

24 मार्च : पाकिस्तान(Pakistan) मधील गिलगिट-बाल्टिस्तान (Gilgit-Baltistan)मध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी कोरोनाबाधित वॉर्डमध्ये काम करणाऱ्या एका तरुण डॉक्टराचा मृत्यू झाला आहे.

त्याच्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी यासाठी सरकारला दोषी ठरवलं आहे. सरकारने जर योग्य मास्क आणि इतर साधनं दिली असती तर त्याचा जीव वाचला असता.

गिलगिट-बाल्टिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री शम्स मीर यांनी सांगितलं की, '26 वर्षीय डॉक्टर ओसामा रियाज (Usama Riaz) यांचा कोरोना व्हायरसची बाधा झाल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला.'

मीर यांनी पुढे सांगितलं की, 'डॉक्टर ओसामा यांनी दुसऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी आपल्या जिवाचं बलिदान दिलं. त्यांना राष्ट्रीय हीरो घोषित करण्यात येत आहे. ओसामा यांची इराण आणि इराकमधून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती.'

26 वर्षीय ओसामा यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या सहकारी मित्रांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी ओसामाच्या मृत्यूबद्दल सरकारला दोषी ठरवलं आहे. बाहेर येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांना योग्य साहित्य दिली नव्हती. एवढंच काय तर सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही चांगले मास्क सुद्धा दिले नव्हते.

ओसामा यांनी मृत्यू होण्याच्याआधी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये ते कोरोनाबाधित रुग्णांची कशी चाचणी करायची याबद्दल सांगत होते. यावेळी त्यांना एक साधा मास्क घातलेला होता.

याच मास्कचा दाखल देत त्यांच्या सहकारी कर्मचारी आणि डॉक्टरांनी पाकिस्तान सरकारवर आरोप केला. "ओसामा हे सलग अनेक तास काम करत होते. कोरोनाबाधित रुग्णांची ते तपासणी करत होते. पण, दुर्दैवाने त्यांच्याकडे कोणतीही योग्य साधनं नव्हती."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2020 01:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading