चीन, 30 जानेवारी: चीनच्या वुहान (Wuhan) शहातून पसरलेल्या कोरोना (Corona Virus) व्हायरसनं सध्या जगभरात हाहाकार माजवला आहे. शेकडो लोकांचे प्राण घेणाऱ्या या जीवघेण्या व्हायरबद्दल रोज नवनवी माहिती आणि दावे समोर येत आहेत. कोरोना व्हायरसबद्दल एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. या धक्कादायक रिपोर्टनं अनेकांची झोप उडवलीय. या रिपोर्टनुसार कोरोना व्हायरची लागण वटवाघळांपासून झाला आहे. याआधी कोरोना व्हायरस सापाच्या दंशातून माणसांच्या शरीरात आला आणि तिथून तो पसरल्याचं सांगितलं जात होतं. कोरोना व्हायरस एका माणसापासून दुसऱ्या माणसाला अत्यंत वेगानं पसरतो. सीएनएनच्या रिपोर्टनुसार पर्यावरण आणि आरोग्य विषयात काम करणाऱ्या एका बिगर सरकारी संस्थेशी जोडल्या गेलेल्या एका डॉक्टरने कोरोना व्हायरसच्या जीन्स वटवाघळाशी मिळत्या जुळत्या आहे.बुधवारी चायनिज सेंटर फॉर डिसिज कंट्रोल एन्ड प्रिवेंशनच्या अभ्यासातूनही जे समोर आलं त्यानुसार कोरोना व्हायरस हा पहिल्यांदा वटवागळात दिसून आला होता.
चीनच्या वैज्ञानिकांनी वर्षभरापूर्वी दिला होता इशारा
वटवाघळापासून पसरणाऱ्या व्हायरसबद्दल चीनमध्ये सातत्यानं संशोधन सुरु आहे. याच शास्त्रज्ञांनी वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता की वटवागळापासून कोरोला व्हायरसची लागण होवू शकते.महत्वाची बाब म्हणजे वुहानमधील शास्त्रज्ञांनीच हा इशारा दिला होता. कोरोना व्हायरस पसरला तर तो प्रचंड धुमाकूळ घालू शकतो. अनेकांचे जीव घेवू शकतो. चीनचं वातावरण कोरोना व्हायरससाठी अत्यंत अनुकूल असून त्यामुळे साथीसारखी परिस्थिती उद्भवू शकते इतका स्पष्ट संकेत देण्यात आला होता. पण व्हायरस कधी, कुठून येईल याचा मात्र कुणालाचा अंदाज नव्हता.