'हाताच्या कोपरावर मारा कोरोना जाईल', चिनी डॉक्टरांच्या धक्कादायक उपचार पद्धतीबद्दल खुलासा

'हाताच्या कोपरावर मारा कोरोना जाईल', चिनी डॉक्टरांच्या धक्कादायक उपचार पद्धतीबद्दल खुलासा

एका फोटोग्राफरनं लॉकडाऊनच्या काळातला अनुभव शेअर केला आहे. डॉक्टर कोरोना व्हायरस घालवण्यासाठी जे उपाय सांगायचे याची माहिती त्यानं दिली आहे.

  • Share this:

शांघाय, 09 एप्रिल : चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे चीनमधील वुहान शहर 76 दिवस लॉकडाऊन करण्यात आलं होतं. आता या शहरातला लॉकडाऊन संपला आहे. तरीही कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. दरम्यान काही धक्कादायक गोष्टी समोर य़ेत आहेत. आता वुहानमध्ये राहणाऱ्या एका फोटोग्राफरनं त्याचा अनुभव शेअर केला आहे. डॉक्टर कोरोना व्हायरस घालवण्यासाठी जे उपाय सांगायचे याची माहिती त्यानं दिली आहे. यामध्ये रुग्णांना दुखापतही व्हायची असा खुलासा त्यानं केला आहे.

वुहानमध्ये राहणाऱा फोटोग्राफर ग्राहमनं लॉकडाऊनच्या काळातील भयानक परिस्थिती कथन केली. त्यानं सांगितलं की, कोरोमामुळे माझं संपूर्ण कुटुंब संक्रमित झालं होतं. सर्वात आधी वडिलांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडलं. आम्हाला सात दिवस रुगालयात ठेवण्यात आलं होतं. त्याआधी कोरोनाग्रस्तांसाठी खास तयार केलेल्या रुग्णालयातही पाठवलं होतं.

Square Cabin hospitals नावाच्या रुग्णालयात कोरोनाची सुरुवातीची लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात होते. याठिकाणी कसा उपचार व्हायचा याबद्दल ग्राहमनं सांगितलं आहे. The Independent शी बोलताना ग्राहम म्हणाला की, इथं डॉक्टर 'Traditional Chinese medicine' चं प्रशिक्षण घेतलेले होते. याच माध्यमातून उपचार केला जात होता. याला काहीच अर्थ नव्हता.

हे वाचा : हे भन्नाट आहे! हेल्मेटनंतर आता 'कोरोना'ची आली कार, PHOTO VIRAL

डॉक्टर्स रुग्णांना सांगायचे की घड्याळाच्या काट्याप्रमाणे तुमची नाभी फिरवा अशामुळे व्हायरस निघून जाईल. तसंच हाताच्या कोपरावरही मारण्यासही सांगतं. यामुळे व्हायरस फुफ्फुसातून निघून जाईल असा अजब उपचार डॉक्टर करायचे अशी माहिती ग्राहमनं the independent ला दिली.

ग्राहम म्हणाला की, दिवसभर रुग्ण हाताच्या कोपरावर मारत असताना दिसायचे. चारी बाजुला तेच दृश्य होतं. अनेक रुग्णांनी इतकं मारून घेतलं की त्यांना गंभीर दुखापत झाली. साथीच्या रोगावेळी चीनी अधिकाऱ्यांनी अत्यंत क्रूर पद्धत अवलंबली. चिनच्या सरकारनं सोडलेल्या या पातळीमुळे धक्का बसल्याचंही ग्राहमने सांगितलं.

हे वाचा : कोरोनाशी लढण्यासाठी US, UK सह 18 देशांनी मोदींना केलं प्रमुख? मेसेज होतोय VIRAL

एका अशा मुलाबद्दल ग्राहमनं सांगितलं की ज्याला त्याच्या आईला शेवटचं पाहताही आलं नाही. ग्राहम म्हणाला की, एक मुलगा रुग्णालयात वारंवार विनंती करत होता की एकदा आईला बघायचं आहे. पण अधिकाऱ्यांनी त्याला बेडलाच बेड्या घालून ठेवला. त्यानंतर आईचं जवळच्याच रुग्णालयात निधन झालं.

कोरोनाच्या साथीमुळे चीन सरकार लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या पातळीवर जाऊ शकतं हे समजलं असंही ग्राहम म्हणला. दोन अडिच महिन्यांच्या या काळात मला हे समजलं की चीनमध्ये कधीच स्वातंत्र्याचा खरा उपभोग घेता येणार नाही. मला वाटतं की चीन सोडणं हा शहाणपणा ठरेल. लॉकडाउन संपल्यानंतर मी पहिल्यांदा हेच करेन.

हे वाचा : लॉकडाऊन हटवताच वुहानमध्ये मांस खरेदीला वेग, अमेरिकेकडून बाजार बंद करण्याची मागणी

First published: April 9, 2020, 4:08 PM IST

ताज्या बातम्या