• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • फळं-भाज्या घेतानाही राहा सावध, नाहीतर होऊ शकते Coronavirus ची लागण

फळं-भाज्या घेतानाही राहा सावध, नाहीतर होऊ शकते Coronavirus ची लागण

फळं-भाज्यांवरही (Fruits, vegetables) कोरोनाव्हायरस (Coronavirus) असू शकतो आणि त्यामार्फतही तो पसरू शकतो, असं जर्मनीतल्या (germany) एका संशोधनात दिसून आलं आहे.

 • Share this:
  बर्लिन, 22 मार्च : भाजी मार्केटमध्ये गेलो की आपण भाज्या-फळं (Fruits, vegetables) खराब तर नाहीत ना, हे तपासून घेतो. मात्र अशी फळं-भाज्या वरून कितीही चांगली दिसत असली, तरी त्याच्यावर असलेले धोकादायक असे व्हायरस तुमच्या डोळ्यांना दिसणार नाही. सध्या कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) संक्रमण होतं आहे आणि अशा फळं-भाज्यांवरही कोरोनाव्हायरस असू शकतो आणि त्यामार्फतही तो पसरू शकतो, त्यामुळे सावध राहा. जर्मन (german) फेडरल इन्स्टिट्युट फॉर रिस्क असेसमेंटने याबाबत अभ्यास केला. या रिपोर्टनुसार फळं आणि भाज्यांना कोणतीही खबरदारी न घेता स्पर्श करणं धोकादायक ठरू शकतं. कारण यामुळे कोरोनाव्हायरससारखा महाभयंकर विषाणूचं संक्रमण होऊ शकतो. हे वाचा - असा होऊ शकतो महाभयंकर कोरोनाव्हायरचा नाश, चीनने सांगितला उपाय संशोधकांच्या मते, बाजारातील या फळं-भाज्यांना कित्येक जण हात लावतात. कदाचित एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीनेही याला स्पर्श केलेला अस शकतो. त्यामुळे फळं भाज्या खरेदी करताना त्यांना थेट स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्या. यासाठी हातामध्ये काहीतरी घाला, नाहीतर थेट हाताने स्पर्श केल्यानंतर फळं-भाज्या आणि हात स्वच्छ धुवून घ्या. या भाज्या शिजवल्यानंतर त्याच्यातून व्हायरस पसरण्याचा धोका नसतो. तुम्ही जर पॅक केलेले फ्रोजन फूड घेत असाल तरीही सावध राहा. फ्रोजन फूड उणे तापमानावर म्हणजे अगदी कमी तापमानात ठेवलं जातं आणि अशा तापमानात कोरोनाव्हायरस जास्त टिकून राहतो. त्यामुळे असे फ्रोजन फूड घेतानाही सावध राहा. अलबत्ता जर्मन इन्स्टिट्युटच्या मते, पॅकेटच्या बाहेर व्हायरस असू शकतो मात्र तो पॅकेटच्या आता पोहोचू शकत नाही. हे वाचा - आता अवघ्या अर्ध्या तासातच कोरोनाचं निदान, संशोधकांनी तयार केलं रॅपिड टेस्ट किट
  Published by:Priya Lad
  First published: