'या' 15 लाख लोकांना तब्बल 3 महिने घराबाहेर पडण्यास मनाई, सरकारने दिले निर्देश

'या' 15 लाख लोकांना तब्बल 3 महिने घराबाहेर पडण्यास मनाई, सरकारने दिले निर्देश

कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) ब्रिटन (Britain) सरकारने काही विशेष लोकांना 3 महिने घरात राहण्याचा सल्ला दिला आहे.

  • Share this:

लंडन, 22 मार्च :  कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात (India) 31 मार्चपर्यंत काही सेवा बंद ठेवण्यात आल्यात, लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो आहे. असाच बंदचा निर्णय (Britain) सरकारनेही घेतला आहे. मात्र ब्रिटनने काही विशेष लोकांना तब्बल 3 महिने घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे.

ब्रिटनमध्ये 5000 पेक्षा जास्त प्रकरणं समोर आलीत, तर 233 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती पाहता ब्रिटन सरकारने काही विशेष अशा 15 लाख लोकांना 3 महिन्यांपर्यंत घरात राहण्याचा सल्ला दिला आहे.  या 15 लाख नागरिकांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे, ज्यांना हाडांचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर, सिस्टिक फायब्रोसिससारखे गंभीर आजार आहेत आणि ज्यांनी नुकतंच अवयव प्रत्यारोपण करून घेतलेलं आहे.

हे वाचा - भारतात कोरोनानं घेतला सहावा बळी, 38 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

कम्युनिटी सेक्रेटरी रॉबर्ट जेनरिक यांनी सांगितल की, अशा लोकांनी घरात राहायला हवं, जेणेकरून वैद्यकीय सेवेवर भार येणार नाही आणि अनेकांचा जीव वाचेल.

रॉबर्ट म्हणाले, जे लोक आधीपासून आजारी आहेत त्यांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त आहे, अशा लोकांनी जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे, असं सरकारनं सांगितलेलं आहे.

ज्यांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त आहे, अशा सर्वांना शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी मिळून अशा लोकांना शोधलं आहे. त्यांना कमीत कमी 12 आठवडे घरात राहण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय घरात कसली गरज भासल्यास एक फोन नंबरही जारी करण्यात आला आहे. फोन करून ही लोकं काहीही ऑर्डर करू शकतात.

हे वाचा -महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला, काही तासांत मुंबई-पुण्यात 10 नवे रुग्ण

इंग्लंडचे डायरेक्टर ऑफ पब्लिक हेल्थ पॉल जॉनस्टन यांनीदेखील एक सूचना जारी केली आहे, ज्यानुसार शॉपिंग किंवा फिरण्यासाठी घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाव्हायरसवर आळा घालण्यासाठी ब्रिटन सरकारने सर्व बार, पब, सिनेमागृह, थिएटर्स आणि सार्वजनिक स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी लागू केली आहे. शनिवार 21 मार्चपासून हा बंद सुरू झाला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सांगितलं की, कॅफे, पब, बार, रेस्टॉरंट, नाइटक्लब, थिएटर, सिनेमागृह, जिमखाने आणि मनोरंजनाची इतर स्थळं आता बंद राहतील. हॉटेलमधून जेवण पॅक करून देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हे वाचा - #Breaking राज्यात कोरोनाने घेतला दुसरा बळी, 63 वर्षीय व्यक्तीचा मुंबईमध्ये मृत्यू

First published: March 22, 2020, 12:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading