आता अवघ्या अर्ध्या तासातच होणार 'कोरोना'चं निदान, संशोधकांनी तयार केलं रॅपिड टेस्ट किट

आता अवघ्या अर्ध्या तासातच होणार 'कोरोना'चं निदान, संशोधकांनी तयार केलं रॅपिड टेस्ट किट

आतापर्यंतच्या चाचण्यांमधून (test) कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) रिपोर्ट येण्यासाठी 2 तास लागत होते.

  • Share this:

लंडन, 21 मार्च : आतापर्यंत कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) निदान करण्यासाठी ज्या चाचण्या (test) केल्या जात आहेत, त्यांचा रिपोर्ट येण्यासाठी तब्बल 2 तास लागत होतं. मात्र आता अशी चाचणी विकसित करण्यात आली आहे, ज्यामुळे अवघ्या 30 मिनिटांतच कोरोनाव्हायरसचं निदान होऊ शकतं.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) संशोधकांनी कोरोनाव्हायरससाठी रॅपिड टेस्टिंग टेक्नॉलॉजी (rapid testing technology ) तयार केली आहे. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोनाव्हायरस आहे की नाही, हे फक्त 30 मिनिटांत समजतं.

संशोधकांनी याची चाचणीही केली आणि ती 100 टक्के यशस्वी असल्याचं दिसलं, आधीच्या टेस्टमध्ये कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आढळलेल्या एकूण 16 जणांवर ही टेस्ट पुन्हा करण्यात आली आणि त्याचे रिपोर्टही अगदी योग्य होते.

हे वाचा - प्रेग्नन्सीत 'कोरोना' झाल्यास बाळालाही व्हायरसची लागण होते का?

या नव्या टेस्टसाठी फक्त हिट-ब्लॉकची गरज आहे, जे ंRNA आणि DNA च्या तापमानासाठी गरजेचं आहे. बाकी या टेस्टसाठी इतर कोणत्याच उपकरणाची गरज नाही. फक्त नमुन्याचा रंग बदल पाहून  कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह की नेगेटिव्ह हे फक्त डोळ्यांनीच ओळखता येणार आहे. ही टेस्ट ग्रामीण भागात किंवा आरोग्य केंद्रांमध्ये खूप फायदेशीर ठरू शकते, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

संशोधकांच्या मते, या रॅपिड टेस्टमुळे अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच कोरोनाव्हायरसचं निदान होऊ शकतं. कोरोनाव्हायरसचं निदान लवकर झाल्याने उपचार लवकर सुरू करता येतील आणि त्यामुळे व्हायरसचा प्रसारही रोखण्यात मदत होईल.

सध्या तरी या टेस्टला यूकेमध्ये वैद्यकीय मान्यता मिळालेली आहे. इतर ठिकाणीही जर या टेस्टला मान्यता मिळाली तर कोरोनाव्हायरसला आळा घालण्यात या टेस्टची खूप महत्त्वाची भूमिका असेल.

आता ऑक्सफर्डची टीम असं उपकरण तयार करतं आहे, जे क्लिनिक, विमानतळ आणि अगदी घरच्या घरीही वापरता येऊ शकेल.

हे वाचा - कोरोनाचा हाहाकार - इटलीत एकाच दिवसात 627 बळी, जगभरात 11 हजार रुग्णांचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2020 02:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading