कोरोनाने हिरावलं तान्ह्या बाळावरचं छत्र, जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच आईचा मृत्यू

कोरोनाने हिरावलं तान्ह्या बाळावरचं छत्र, जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच आईचा मृत्यू

कोरोनाने घेतला सर्वात तरुण रुग्णाचा बळी, काही दिवसांआधीच या महिलेने दिला होता मुलाला जन्म.

  • Share this:

वर्झावा 21 मार्च : कोरोनामुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. चीनच्या वुहानमधून आलेल्या या कोरोनाने आतापर्यंत 11 हजार लोकांचा जीव घेतला आहे. तर, 2 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीमध्ये तर कोरोनाने थैमान घातले आहे. चीनपेक्षा इटलीमधील मृतांची संख्या जास्त आहे. मुख्य म्हणजे फक्त वृद्धच नाही तर तरुणांनीही कोरोनाने आपले शिकार केले आहे. पोलंडमध्ये अशाच एका 27 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पोलंडमध्ये मृत झालेली ही महिला मुलाला जन्म दिल्यानंतर निरोगी होत. मात्र त्यानंतर काही दिवसांनी तिला कोरोनाची लागण झाली आणि तिचा मृत्यू झाला. पोलंडमधील कोरोना विषाणूमुळे झालेला हा सहावा मृत्यू आहे, तर जगभरात कमी वयाच्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.

वाचा-'अब मैं सबमें फैलाऊंगा कोरोना', VIRAL VIDEO नंतर लोकांमध्ये भीती

अलीकडेच इटलीमधून परत आलेल्या तिच्या आईकडून या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. पोलंडमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने काही दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला होता आणि तिला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. मात्र त्यानंतर या महिलेला कोरोनाची लागण झाली. यूकेमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 144 लोकांचा मृत्यू झाला आहे तर, 3,000 हून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे.

वाचा-कोरोनाचा हाहाकार - इटलीत एकाच दिवसात 627 बळी, जगभरात 11 हजार रुग्णांचा मृत्यू

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकार विविध मार्गांनी लोकांना जागरूक करत आहे आणि लोकांना सामाजिक अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पोलंडचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी लोकांना 12 आठवडे लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

वाचा-संतापजनक! हातावर स्टॅम्प मारल्यानंतरही कुलगुरूंनी केला मुंबई-पुणे प्रवास

जगभरात 11 हजार जणांचा मृत्यू

जगभरात कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 11 हजारांवर पोहोचली आहे. आतापर्यंत सर्वाधिक मृतांचा आकडा हा चीनमध्ये होता. मात्र शुक्रवारपासून इटलीमध्ये मृतांची संख्या वाढली आहे. इटलीमध्ये 24 तासांत 627 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची संख्या 4032 वर पोहोचली आहे. हे प्रमाण चीनपेक्षाही जास्त आहे.

First published: March 21, 2020, 3:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading