Home /News /videsh /

तुम्हीही असू शकता कोरोनाव्हायरसचे Super spreader! विषाणू वेगाने पसरायचं भयंकर कारण आलं पुढे

तुम्हीही असू शकता कोरोनाव्हायरसचे Super spreader! विषाणू वेगाने पसरायचं भयंकर कारण आलं पुढे

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

कोरोनाव्हायरसने (Coronavirus) आपल्याकडे एक सिक्रेट असं शस्त्र ठेवलं आहे, ते म्हणजे सुपर स्प्रेडर (Super spreader). ज्यामुळे कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे.

    मुंबई 12 फेब्रुवारी : संपूर्ण जग कोरोना व्हायरसविरोधात (Coronavirus) लढा देत आहे, मात्र कोरोनाव्हायरसने आपल्याकडे एक सिक्रेट असं शस्त्र ठेवलं आहे, ते म्हणजे सुपर स्प्रेडर (Super spreader) आणि हा सुपर स्प्रेडर तुम्हीही असू शकता. कोरोनाव्हायरसचा हा सुपर स्प्रेडर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नकळतपणे कोरोनोव्हायरस पसरवतो आहे, ज्यामुळे कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. कोरोना व्हायरस वेगानं पसरण्याचं हे कारण आता पुढे येत आहे. हाँगकाँगच्या टॉवरमधील सुपर स्प्रेडर हाँगकाँगच्या एका टॉवरमध्ये एका व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर बिल्डिंगमध्ये आणखी कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आले. या सर्व व्यक्तींच्या घरातील बाथरूमच्या आणि डक्टमधल्या खुल्या पाइपमधून विषाणूची लागण झाली असावी असा अंदाज आहे. म्हणजे प्रत्यक्ष संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात न येताही हा विषाणू इतर व्यक्तींमध्ये पसरला. एका सुपर स्प्रेडरने तब्बल 3000 रहिवाशांचा जीव धोक्यात घातला. सुपर स्प्रेडर असणाऱ्या अशा एका व्यक्तीमुळे कित्येक लोकांना या जीवघेण्या विषाणूची लागण होऊ शकते, हे आता स्पष्ट झालं आहे. हेदेखील वाचा - चीनहून आलेलं पार्सल घेताना सावधान ! पार्सलमध्ये ‘कोरोना’ तर नाही ना? सुपर स्प्रेडर म्हणजे काय? एखाद्या व्हायरसचं इन्फेक्शन झालेली व्यक्ती सामान्य स्प्रेडर असते. म्हणजे त्या व्यक्तीच्या संपर्कात एखादी व्यक्ती आल्यास तिलाही व्हायरसचं इन्फेक्शन होतं. त्यानंतर या दोन्ही व्यक्तींमध्ये लक्षणं दिसून येतात. सामान्य स्प्रेडर सरासरी 2.6 व्यक्तींपर्यंत व्हायरस पसरवतो. मात्र सुपर स्प्रेडर हा सामान्य स्प्रेडरपेक्षा वेगळा आहे. त्याला सामान्य स्प्रेडरप्रमाणेच व्हायरसचं इन्फेक्शन होतं आणि आपल्याला व्हायरसचं इन्फेक्शन झालं याची कल्पना त्यालाही नसते. त्यामुळे नकळतपणे तो इतर व्यक्तींच्या संपर्कात येतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरस पसरवतो. सुपर स्प्रेडर सरासरी ८ जणांपर्यंत व्हायरस पसरवतो आणि त्यातही जर कोरोनाव्हायरससारखा व्हायरस जो लक्षणं दिसण्याच्या आधी 14 दिवस शरीरात असतो, त्याचा प्रसार होतच असतो. कोरोनाव्हायरसचा ब्रिटिश सुपर स्प्रेडर यूकेतील प्रसिद्ध उद्योगपती स्टिव्ह वॉल्श हे कदाचित कोरोनाव्हारयसचे सुपर स्प्रेडर असू शकतात.  वॉल्श जेव्हा सिंगापूरमध्ये एका कामानिमित्त गेले तेव्हा कदाचित त्यांना कोरोनाव्हारसची लागण झाली, मात्र त्यांना याबाबत माहिती नव्हती. त्यानंतर त्यांनी भरपूर प्रवास केला आणि यादरम्यान त्यांच्यामुळे तब्बल 11 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली. वॉल्श यांची प्रकृती सुधारली मात्र त्यांच्यामुळे इतर 11 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरण्यासाठी कोरोनाव्हायरस अशा मानवी वाहकांचा वापर करतो आहे. हेदेखील वाचा - Fact check : चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच कोरोनाव्हायरस होतो का? कोरोनाव्हायरसची लक्षणं आणि उपाय सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेताना त्रास, डोकेदुखी ही लक्षणं सर्वसामान्य वाटत असली तरी ती कोरोनाव्हायरसची लक्षणं असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणं दिसताच दुर्लक्षणपणा करू नका, तात्काळ डॉक्टरांकडे जा. कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी हात स्वच्छ धुवा, शिंकताना आणि खोकताना तोंडासमोर रुमाल धरा, सर्दी-खोकला-तापाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहू नका आणि शक्यतो प्राण्यांपासून दूर राहा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या