Home /News /videsh /

Coronavirus ने स्पेनच्या प्रिन्सेसचाही घेतला जीव, तब्बल 5,982 रुग्णांचा बळी

Coronavirus ने स्पेनच्या प्रिन्सेसचाही घेतला जीव, तब्बल 5,982 रुग्णांचा बळी

जगातील शाही कुटुंबातील कोरोनाव्हायरसमुळे(Coronavirus) होणारा हा पहिला मृत्यू आहे.

    माद्रिद, 29 मार्च : स्पेनची (Spain) प्रिन्सेस मारिया टेरेसा (Maria Teresa) यांचा कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. त्यांचा भाऊ प्रिन्स सिक्सो एनरिक दे बॉरबॉन यांनी सोशल मीडियावर आपल्या बहिणीच्या मृत्यूबाबत सांगितलं आहे. जगातील शाही कुटुंबातील कोरोनाव्हायरसमुळे होणारा हा पहिला मृत्यू आहे. स्पेनचे राजा फिलिप-4 (King Felipe IV) यांची चुलत बहीण आणि बॉरबॉन-पार्माची प्रिन्सेस मारिया टेरेसा यांचा शनिवारी कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. 86 वर्षीय मारिया या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान गुरुवारी झालं. गेले 3 दिवस त्या वेंटिलेटरवर होत्या.  मारिया यांचा भाऊ प्रिन्स सिक्स्तो एनरिक दे बॉरबॉन यांनी फेसबुक पोस्टमार्फत आपल्या बहिणीच्या मृत्यूबाबत सांगितलं आहे. या फेसबुक पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, पॅरिमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी माद्रिदमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. हे वाचा -  देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, आतापर्यंतचा आकडा 193 वर जगभरात इटलीनंतर स्पेनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झालेत. स्पेनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे शनिवारपर्यंत एकूण 5,982 जणांचा मृत्यू झाला आहे. 73 हजार पेक्षा जास्त जणांना या व्हायरसची लागण झाली आहे.  स्पेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, देशात कोरोनाव्हायरसने तिसरा टप्पाही ओलांडला आहे, मात्र आता प्रकरणं कमी आहेत. स्पेनमध्ये दररोज सरासरी 8 हजारपेक्षा जास्त प्रकरणं समोर येत आहेत.  माद्रिद सर्वात प्रभावित क्षेत्र आहे, जिथं 2,757 लोकांचा मृत्यू झाला आहे, 21,520 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आपात्कालीन प्रकरणांचे समन्वयक फर्नांडो सिमोन यांनी सांगितलं की, 'कोरोनाव्हायरसची नवी प्रकरणं आता कमी झाली आहेत, त्यामुळे रुग्णांची संख्या आता स्थिरावली आहे' हे वाचा - कोरोनाग्रस्तांसाठी अभिनेत्री झाली नर्स, अभिनय सोडून करतेय रुग्णांची सेवा
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या