Home /News /videsh /

भारताच्या 10 दिवस आधी लॉकडाउन केलेल्या देशात आतापर्यंत 10 हजार जणांचा मृत्यू

भारताच्या 10 दिवस आधी लॉकडाउन केलेल्या देशात आतापर्यंत 10 हजार जणांचा मृत्यू

जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. चीननंतर कोरोनाचा विळखा इटली, इराण आणि युरोपातील देशांना बसला आहे.

    मद्रीद, 02 एप्रिल : जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. चीननंतर कोरोनाचा विळखा इटली, इराण आणि युरोपातील देशांना बसला आहे. इटलीमध्ये गेल्या आठवड्याभरात दररोज जवळपास हजार नागरिकांचा मृत्यू झाला .आता तशीच वेळ स्पेनवर आली आहे. गुरुवारपर्यंत 24 तासात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत मृतांची संख्या 10 हजारांवर पोहोचली आहे. स्पेनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजार 238 इतकी आहे. इटलीपेक्षा ही संख्या थोडी कमी आहे. इटलीत 1 लाख 10 हजार 574 लोकांना कोरोना झाला आहे. इटलीत मृतांचे प्रमाण जास्त असून आतापर्यंत 13 हजार 155 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये आतापर्यंत 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनच्या प्रशासनाने हा सर्वात भयानक काळ असल्याचं म्हटलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. स्पेनने 14 मार्चला लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यानंतरही तिथली परिस्थिती गंभीर आहे. 12 मार्चनंतर जवळपास 3 लाख कामगारांची नोकरी गेली आहे. पूर्ण युरोपात कोरोनाचा विळखा पडला आहे. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांना कोरोना झाला आहे. तर मृतांची संख्या एकूण 34 हजार 571 इतकी झाली आहे. हे वाचा : मृत्यू समोर दिसत असतानाही 90 वर्षांच्या आजीने व्हेंटिलेटर दिलं तरूण रूग्णाला भारतात पंतप्रधान मोदींनी 24 मार्चला लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर आतापर्यंत देशात 2 हजार पेक्षा अधिक रुग्णांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. तर कोरोनामुळे 53 जणांचा मृत्यू तर 156 जण ठणठणीत बरे झाले आहे. हे वाचा : भयंकर... अमेरिकेत शवपेट्याही पडताहेत अपुऱ्या, दिली लाखभर ‘बॉडी बॅग’ची ऑर्डर
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या