कोरोनात आणखी एक महासंकट, चीनमध्ये सापडला नवा व्हायरस

कोरोनात आणखी एक महासंकट, चीनमध्ये सापडला नवा व्हायरस

एच 1 एन 1 स्वाइन फ्लूचा अनुवांशिक वंशज आहे असंही सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जून : चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार पसरवला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस नवे रेकॉर्डब्रेक करत असतानाच आता आणखी एक मोठं संकट जगसमोर उभं राहण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनासारखाच आणखी एक विषाणू शास्त्रज्ञांना चीनमध्ये सापडला आहे. हा संसर्ग जगभरात पसरू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

डुकरांपासून माणसांना होणारा G4 EA H1N1 हा आजार वेगानं संसर्ग पसरत असल्याचंही चीनच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. चीनच्या संशोधकांना हा नवीन फ्लू आढळला आहे. कोरोनाच्या महासंकटात हे आणखी एक संकट जगभरात ओढवण्याची शक्यता आहे. अमेरिकन सायन्स जर्नल पीएनएएसमध्ये या अभ्यासासंदर्भात माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

हे वाचा-

नव्याने सापडलेला स्वाइन फ्लू आजार 2009 मध्ये संपूर्ण जगात पसरलेल्या एच 1 एन 1 स्वाइन फ्लूचा अनुवांशिक वंशज आहे असंही सांगण्यात आलं आहे. 2009 मध्ये स्वाईन फ्लूनं जगभरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर हा नवीन फ्लूही धोकादायक असल्यानं अशाच प्रकारे चिंतेचं कारण ठरू शकतो अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 30, 2020, 9:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading