Home /News /videsh /

SAARC कॉन्फरन्समध्ये इम्रान यांनी पाठवलेल्या प्रतिनिधीनेच केलं 20 लाख मास्कचं स्मगलिंग? पाक कोर्टात खटला सुरू

SAARC कॉन्फरन्समध्ये इम्रान यांनी पाठवलेल्या प्रतिनिधीनेच केलं 20 लाख मास्कचं स्मगलिंग? पाक कोर्टात खटला सुरू

पंतप्रधान मोदींसह सार्क (SAARC)देशांच्या प्रमुखांची रविवारी एक बैठक झाली. आता उघड झालेल्या माहितीनुसार, यात इम्रान खान यांच्याऐवजी सहभागी झालेल्या जफर मिर्झांवरच मास्कच्या स्मगलिंगचे आरोप आहेत.

  इस्लामाबाद, 16 मार्च : पंतप्रधान मोदींसह सार्क (SAARC)देशांच्या प्रमुखांची रविवारी एक बैठक झाली. coronavirus च्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमी या बैठकीला होती. . व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अनुपस्थित होते. त्यांच्याऐवजी जफर मिर्झा या त्यांनी नेमलेल्या प्रतिनिधींनी बैठकीत भाग घेतला. आता उघड झालेल्या माहितीनुसार, या जफर मिर्झांवरच मास्कच्या स्मगलिंगचे आरोप आहेत. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्याऐवजी या बैठकीत मिर्झा यांची नियुक्ती केली होती. ते पाकिस्तानच्या आरोग्यविषय प्रकरणांचे सल्लागार आणि इम्रान यांचे विशेष साहाय्यक म्हणून या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला उपस्थित होते. आणि त्यांच्यावरच स्मगलिंगसारखे गंभीर आरोप असल्याचं आता उघड होत आहे. कोरोनाव्हायरसला आटोक्यात आणण्यासंदर्भात चर्चा या बैठकीत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांनी या महासाथीशी मुकाबला करण्यासाठी निधी उभारण्याचं आवाहन केलं. वाचा - महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद, निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याची शिफारस त्याला बहुगतेक सर्व देशांनी चांगला प्रतिसाद दिला. पाकिस्तानने या बैठकीतही काश्मीरचं तुणतुणं वाजवणं थांबवलं नाही. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या जफर मिर्झांवर त्यांच्याच देशात स्मगलिंगचे आरोप झाले आणि त्यासंदर्भाक खटलासुद्धा सुरू आहे. हे वाचा - सावधान मुंबई! कोरोनाचे आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह, राज्यातील रुग्णांची संख्या 38 वर
  पाकिस्तानची फेडरल इन्व्हेस्टिगेश एजन्सी या स्मगलिंगच्या केससंदर्भात तपास करत आहे. पाकिस्तानातून 20 लाख मास्क बेकायदेशीरपणे अन्य देशांमध्ये पाठवल्याचा आरोप मिर्झांवर आहे. त्यासंदर्भात पाकिस्तान कोर्टात खटलासुद्धा दाखल झाला आहे. या महाशयांनी या मास्कचं स्मगलिंग केल्याचे थेट आरोप आहेत. इम्रान खान यांनी आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी अशा व्यक्तीची निवड केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे आणि त्यांच्याच देशात त्यांना टीकेचा सामना करावा लागतो आहे.
  पाकिस्तान फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (FIA)दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर त्यांना आता 15 दिवसात उत्तर द्यायचं बंधन आहे. पाकिस्तानच्या यंग फार्मासिस्ट असोसिएशनचे प्रमुख डॉक्टर फुकरान इब्राहिम यांनी जफर मिर्झांवर आरोप केले आहेत. ड्रग रेग्युलेटरी अॅथॉरिटी, पाकिस्तान आणि मिर्झा यांनी मिळून हा मास्क घोटाळा केल्याचा आरोप आहे. 20 लाख मास्क त्यांनी काळ्या बाजारात विकले आणि परदेशात बेकायदेशीरपणे पाठवले. सार्क देशांच्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे, मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, भूटानचे पंतप्रधान लोटे शेरिंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी उपस्थित होते. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या ऐवजी त्यांचे आरोग्यविषयक सल्लागार आणि विशेष साहाय्यक जफर मिर्झा यांनी या बैठकीत उपस्थिती लावली. अन्य बातम्या म्हणे ‘कोरोना म्हणजे अल्लाहने दिलेली शिक्षा’; त्याच धर्मगुरूला व्हायरसचा विळखा केरळनंतर राजस्थानातील 3 रुग्णही ठणठणीत झाले, 'कोरोना'वरील उपचाराचं जयपूर मॉडेल भारतीय गोलंदाजाच्या घरी लगीनघाई! कोरोनाच्या धाकात उरकला साखरपुडा
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  पुढील बातम्या