कोरोनाची चौथी लाट धडकणार? जगभरातील अनेक देशांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता आशिया खंडात पुन्हा कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. खबरदारी न घेतल्यास जगभरात कोरोनाचा उद्रेक होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाची नवी लाट पहायला मिळू शकते असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने तसेच इतरही शास्त्रज्ञांनी दिला आहे. वाचा : पुन्हा कोरोना! प्रकोप वाढला; चीनमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत दोन वर्षांतला उच्चांक चीनमधील या भागांत सर्वाधिक रुग्ण चीनमधील जिलिन शहरात यापूर्वी लॉकडाऊन लावण्यात आला होता. तर शेजारील राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. जिलिनला लागून असलेल्या यांजीची सीमा उत्तर कोरियाला लागून आहे. या ठिकाणी एकूण सात लाख नागरिक राहतात. त्यामुळे येथे अत्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रविवारी जिलिन शहरात 1412 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. हे शहर चीनच्या ईशान्येला आहे. रविवारपर्यंत जिलिन येथे एकूण 2052 बाधितांचीन नोंद झाली. त्यापैकी 1227 जणांना लक्षणे नव्हती. चीनमधील जिलिन शहर आणि चांगचुन राज्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पहायला मिळत आहे. वाचा : सावधान! धोका अजूनही टळला नाही; चीनमध्ये कोरोनानं वर काढलं डोकं; Wuhan हॉटस्पॉट हाँगकाँगमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली येथील नेत्या कॅरी लॅम यांनी सोमवारी सांगितले की, जर आपण नवीन आकडेवारी पाहिली तर शहराची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडत आहे. पण महामारी सुरू झाल्यापासून आम्ही कठोर निर्बंध लागू करुन आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत. येथे दोन व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, इतर संस्था आणि सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. सोमवारी हाँगकाँगमध्ये एका दिवसात 249 जणांचा मृत्यू आणि 26,908 नवीन रुग्णांची नोंद झाली.#BREAKING China reports record 5,280 new Covid cases pic.twitter.com/Y8ShP2TdTB
— AFP News Agency (@AFP) March 15, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Coronavirus, Lockdown