Home /News /videsh /

चमत्कार! कोरोनामुळे कोमात गेलेल्या 9 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेने दिला बाळाला जन्म

चमत्कार! कोरोनामुळे कोमात गेलेल्या 9 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेने दिला बाळाला जन्म

अँजला मुलीची आई झाली. नंतर काही दिवसांनी त्या कोमातून बाहेर आल्या आणि कोरोनामुक्तही झाल्या.

  वॉशिंग्टन 16 एप्रिल: अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजलाय. मृत्यूच्या आकड्याने तर उच्चांक गाठला आहे. दररोज हजारो रुग्ण नव्याने सापडत आहेत. प्रचंड मोठी आर्थिक हानी झालीय. सगळा देश चिंताग्रस्त आहे. अशातच काही दिलासादायक गोष्टीही घडत आहेत. 9 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेला कोरोना झाला आणि काही दिवसानंतर ती कोमात गेली. त्या अवस्थेत डॉक्टरांनी तिचं बाळंतपण केलं. तिला मुलगी झाली आणि नंतर ती सुद्धा कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आली. CNNने याबाबतचं वृत्त दिलं आहे. त्या सुदैवी महिलेचं नाव आहे अँजला प्रिमाचेंको. अँजला या श्वसनविकाराच्या तज्ज्ञ आहेत. प्रेग्नन्सीचा त्यांचा 34 वा आठवडा सुरू होता. सगळं काही चांगलं सुरू होतं. 15 दिवसांमध्ये घरी नवा पाहुणा येणार होतं. मात्र त्याच वेळी तिला कोरोनाची लक्षणं दिसून येवू लागली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तापही येत होता. त्यानंतर 26 मार्चला तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तीन दिवसांनी  प्रकृती बिघडल्याने ICUमध्ये आणि नंतर तर व्हेंटिलेटरवरच टाकावं लागलं. त्या ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. पोटात बाळ असल्याने सर्व डॉक्टर्स चिंतेत होते. अँजला या कोमात गेल्या होत्या.

  अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना भारतीय महिलेनं घेतला शेवटचा श्वास

  सर्व डॉक्टर्स, नर्स प्रयत्नांची शर्थ करत होते. अखेर 4 एप्रिलला तिची डिलेव्हरी यशस्वी झाली. अँजला  मुलीची आई झाली. नंतर काही दिवसांनी त्या कोमातून बाहेर आल्या आणि कोरोनामुक्तही झाल्या.

  दर मिनिटाला 3 लोकांचा मृत्यू, अमेरिकेनं गेल्या 24 तासांत मोडले कोरोनाचे विक्रम

  पण चिमुकल्या मुलीला त्यांना घेता येत नव्हतं. कारण तिच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट येणं बाकी होतं. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि काही दिवसांनी तिने आपल्या मुलीला हातात घेतलं. त्यावेळी तिच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या.
  View this post on Instagram

  Our little sunshine is doing amazing!planning to come home this weekend! 💞

  A post shared by Angela Primachenko (@angela_primo) on

  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या