कोरोनापुढे पाकने गुडघे टेकले, रुग्णांना दिली अशी वागणूक की भारतीयांचेही डोळे पाणावले

कोरोनापुढे पाकने गुडघे टेकले, रुग्णांना दिली अशी वागणूक की भारतीयांचेही डोळे पाणावले

कोरोना विषाणूने पाकिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेची पोलखोल केली आहे. कोरोनाग्रस्तांना आरोग्य सुविधाही मिळत नाही आहेत.

  • Share this:

कराची, 22 मार्च : कोरोना विषाणूने साऱ्या जगात थैमान घातला आहे. आशियाई खंडातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण होताना दिसत आहे. मात्र या कोरोना विषाणूने पाकिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेची पोलखोल केली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने पाकिस्तान-इराण सीमेवर बांधण्यात आलेल्या छावण्यांमध्ये लोकांचे प्राण्यांपेक्षा वाईट हाल होत आहेत. अस्वच्छ जागा आणि अपुऱ्या सुविधा यांमुळे 6000 हून अधिक लोकांचा जीव धोक्यात आला आहे. पाकने सीमेवर उभारलेल्या छावणीत दोन आठवडे घालवलेल्या मोहम्मद बाकीरने तेथील लोकल माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे. बाकिरने यावेळी स्वच्छता सुविधा तर दूर, लोकांना स्वच्छ तंबू आणि शौचालयही मिळत नाही आहे असे सांगितले.

वाचा-मास्क-सॅनिटायझरच्या खरेदीसाठी ही सरकारी कंपनी देणार कर्मचाऱ्यांना 1000 रुपये

बाकीरने यावेळी, मी आतापर्यंत एवढी घाणेरडी जागा कधीच पाहिली नाही. छावणीतील ते दोन आठवडे माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होते. इकडे प्राण्यांपेक्षा वाईट वागणूक माणसांना दिली जात आहे, असेही सांगितले. बाकिरच्या या वक्तव्यानंतर पाकची पोलखोल झाली आहे.

वाचा-कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी बाजारात नवीन नोटा? जाणून घ्या काय आहे SBI चा सल्ला

तर, पाकमधील डॉक्टरांनी, जर एखाद्या व्यक्तीला संसर्ग होण्याची चिन्हे दिसली तर त्यांना वेगळे ठेवण्याची सोयही येथे नाही आहे. डॉक्टर आणि नर्सचीही कमतरता आहे. डॉक्टरांनाच औषधांसाठी पैसे द्यावे लागतात. तर, नाव न छापण्याच्या अटीवरून दुसऱ्या एका डॉक्टरांनी, पहिल्या 20 दिवसांत बऱ्याच लोकांना कोरोनाची लागण झाली, पण पुढील तीन आठवडे पाककडे कोणतीही चाचणी सुविधा नव्हती, असे सांगितले. पाकमध्ये सध्या 600हून जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. मात्र त्यांना योग्य त्या सुविधा मिळत नाही आहेत.

वाचा-'मी कोरोना पॉझिटिव्ह', Tiktokवर व्हिडीओ टाकणाऱ्या तरुणावर पोलिसांनी केले उपचार

दरम्यान पाक-इराण यांच्यात 600 किमीची सीमा आहे. इराणमध्ये सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे इराणमध्ये असलेले पाक नागरिक मायदेशी परतत आहेत. त्यामुळे पाकमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे.

First published: March 22, 2020, 2:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading