Home /News /videsh /

इम्रान खान यांनाही वाटतेय तबलिगींची भीती, वाचा पाकिस्तानात कसा माजलाय हाहाकार

इम्रान खान यांनाही वाटतेय तबलिगींची भीती, वाचा पाकिस्तानात कसा माजलाय हाहाकार

पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 21 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, 476 लोकांचा मृत्यू झाला आहे.

    इस्लामाबाद, 05 मे : पाकिस्तानमध्ये कोरोनो थैमान घातलाना दिसत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी मशिदींमध्ये सशर्त प्रार्थना करण्यास परवानगी दिल्यानंतर कोरोना (Coronavirus) रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 21 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, 476 लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असताना पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन हळुहळु हटवण्याची गरज असल्याचेही सांगितले. पाकमधील एक रिपोर्टनुसार, येथील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत 27% रुग्ण हे तबलिगींमुळे (Tableeghi Jamaat) पसरले आहेत. ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार 10 मार्च रोजी पंजाबमधील रायविंद शहरात तबलिगी जमातच्या लोकांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये सरकारी आकडेवारीनुसार सुमारे 80 हजार लोकांचा सहभाग होता. पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार यातील 3 हजार लोक परदेशी होते आणि ते 40 वेगवेगळ्या देशांमधून आले होते. अमेरिका, इंग्लंड, फिलिपिन्स आणि बर्‍याच अरब देशांतील लोकही येथे आले. नंतर, संपूर्ण रायविंड शहर सील करावे लागले कारण ते इराणमधून आलेल्या यात्रेकरूनंतर पाकिस्तानमध्ये तबलिगी कोरोनाचा पसरवण्याचे सर्वात मोठे साधन मानले जात आहे. वाचा-सामूहिक बलात्काराचा प्लानिंग करत होते शाळकरी मुलं, इन्स्टाग्राम चॅट झालं लिक पाकमध्ये 30% रुग्ण तबलिगींमुळे पसरले या रिपोर्टनुसार, या कार्यक्रमात सहभागी झालेले लोकांमध्ये परदेशी नागरिकांचा जास्त समावेश होता. कोरोनामुळं विमान प्रवास बंद झाल्यामुळं शेकडो लोकं पाकिस्तानात अडकले होते. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमातचे काही मोठे प्रचारक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यामुळं त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर, 40 हजारहून अधिक तबलिगींना सध्या क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर, 70 हजारहून अधिक तबलिगींचा शोध सुरू आहे. सिंध प्रांतानंतर पंजाबमध्ये कोरोनाचे सगळ्यात जास्त 7 हजार 646 रुग्ण आहेत. एकट्या रावळपिंडी शहरात 2 हजार 300 कोरोना रुग्ण आहेत, यातील सर्व तबलिगी कार्यक्रमात सहभागी झाले होते. वाचा-कर्नल आशुतोष यांनी आईसाठी लिहिलेली शेवटची कविता, वाचून तुमचेही डोळे पाणावतील लॉकडाऊन हटवण्याच्या विचारात आहेत इम्रान दुसरीकडे इम्रान खान 'कोरोना रहाट टायगर फोर्स' या कार्यक्रमात, पाकिस्तानमध्ये अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन जाहीर केला जाऊ शकत नाही. येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने बंद हटवण्यात येईल. 'कोरोना राहत टायगर फोर्स' ही पाकिस्तानमधील एक युवा संघटना आहे जी सरकारची मदत गरिबांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करेल. पाकिस्तानमधील लॉकडाऊन 9 मेला संपणार आहे. त्यानंतर काही प्रमाणात लॉकडाऊनचे नियम शिथील केले जाऊ शकतात. आज इम्रान खान या परिस्थितीबद्दल चर्चा करणार आहेत. वाचा-Fact Check: सरकार बेरोजगारांना प्रत्येक महिन्यात देणार 3500 रुपये? खरं की खोटं
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या