Home /News /videsh /

कोरोनाचा कहर: वृद्धांना सोडलं देवाच्या भरवश्यावर, वृद्धाश्रमात सापडले 19 मृतदेह

कोरोनाचा कहर: वृद्धांना सोडलं देवाच्या भरवश्यावर, वृद्धाश्रमात सापडले 19 मृतदेह

या वृद्धाश्रमात जेव्हा लष्कराच्या जवानांनी प्रवेश केला तेव्हा त्यांना तिथे 19 जण मृतावस्थेत सापडले.

  माद्रिद 24 मार्च : युरोपात इटलीनंतर कोरोनाने स्पेनमध्ये सर्वाधिक थैमान घातलं आहे. सुरुवातीच्या काळात पुरेशा गांभीर्याने याकडे पाहिलं नसल्याने सर्व देशभर हा व्हायरस पसरला आहे. सर्व देशालाच आता लॉकडाउन करण्यात आलं असून आणीबाणीही लागू करण्यात आली आहे. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून कोरोना बाधितांची संख्याही प्रचंड वेगाने वाढत आहे. आत्तापर्यंत 2300 जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी माद्रिदला सर्वात जास्त फटका बसला आहे. शहरातल्या एका वृद्धाश्रमाचं धक्कादायक वास्तव पुढे आल्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. या वृद्धाश्रमात जेव्हा लष्कराच्या जवानांनी प्रवेश केला तेव्हा त्यांना तिथे 19 जण मृतावस्थेत सापडले. यातल्या 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचं स्पेन सरकारने म्हटलं असून या वृद्धश्रमाचं व्यवस्थापन पाहणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. तर आरोग्य व्यवस्थेवरचा ताण प्रचंड वाढत असून रुग्णांची क्रमवारी ठरवतांना या वृद्धांना देवाच्या भरवश्यावर सोडण्यात आलं असावं अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्यांची जगण्याची शक्यता जास्त आहे. वयाने जे तरूण आहेत त्यांना आधी प्राधान्य दिलं जात आहे. स्पेनमध्ये आत्तापर्यंत 35 हजार 212 जणांना लागण झाली आहे.

  कोरोना म्हणजे जोक वाटला का, रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांची पाहा काय अवस्था झाली

  बंद असलेल्या अनेक मॉल्सचं रुपांतर आता शवगृहात करण्यात आलं आहे. कारण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे की मृतदेह हॉस्पिटल्समध्ये ठेवायला जागा सुद्धा नाहीत त्यामुळे या मॉल्समध्ये शितगृह तयार करून तिथे मृतदेह ठेवले जात आहेत. एकाच दिवसात 394 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 170 झाली आहे. येत्या काळात आणखी वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागेल असं स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅँचेज यांनी म्हटलं आहे. सरकार देशातल्या हॉस्पिटल्समध्ये साधनांची कमतरता पडू देणार नाही असंही त्यांनी म्हटल्याचं वृत्त ‘बीबीसी’ने दिलं आहे.

  'तो' अपघात पडला महागात, एका तरुणीमुळे 5000 लोकांना झाला कोरोना

  राजधानी माद्रिदमध्ये कोरोनाचा सर्वात जास्त कहर आहे. देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून लोकांनी घराबाहेर पडू नये असे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे सर्व देशच लॉकडाऊन झाला आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या