लॉकडाऊन हटवणं पडलं महागात, कोरोनाच्या एण्ट्रीनंतर वुहान करणार 1.11 कोटी लोकांची चाचणी

लॉकडाऊन हटवणं पडलं महागात, कोरोनाच्या एण्ट्रीनंतर वुहान करणार 1.11 कोटी लोकांची चाचणी

76 दिवसांचा लॉकडाऊन हटवल्यानंतर वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, पुन्हा होणार लोकांची कोरोना चाचणी.

  • Share this:

वुहान, 13 मे : चीनच्या वुहानमधून डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता वुहान शहर हे कोरोनाचं केंद्र झालं होतं. जगात सगळ्यात आधी वुहानमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र कोरोनाचे एकही नवीन प्रकरण न सापडल्यानंतर वुहाननं तब्बल 76 दिवसांनी लॉकडाऊन हटवला. मात्र आता पुन्हा कोरोनानं वुहानमध्ये प्रवेश केला आहे. एवढंच नाही तर वुहानमध्ये पुन्हा एकदा क्लस्टर ट्रान्समिशन दिसून आलं आहे. त्यामुळं आता वुहानमधील सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

तर, रशियाच्या सीमेवर असलेल्या शुलान शहरात (Shulan City) क्लस्टर स्वरूपाचे कोरोना संक्रमण होत असल्याचं समोर आलं आहे.सध्या वुहानमध्ये 6 नवीन कोरोनाची प्रकरणं समोर आली. यामुळं चीन सरकारचे धाबे दणाणले आहेत. वुहानमध्ये पुन्हा कोरोनाची प्रकरणं समोर आल्यानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षानं स्थानिक अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्यामुळं आता वुहानमधील तब्बल 1.11 कोटी लोकांची कोरोना चाचणी पुन्हा करण्यात येणार आहे.

वाचा-ज्याच्या घरी केली चोरी तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, आता चोरांची अशी झाली अवस्था

यासाठी आता एक खास प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील प्रत्येक जिल्ह्यात 10 दिवसांत कोरोना चाचणी आणि सामग्रीची तयारी करावी लागणार आहे. दरम्यान ही चाचणी कधी पासून सुरू केली जाणार, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही आहे. 76 दिवसांचा लॉकडाऊन 8 एप्रिल रोजी हटवल्यानंतर वुहानमध्ये पहिले प्रकरण शनिवारी समोर आले. त्यानंतर सोमवारपर्यंत तब्बल 6 नवीन प्रकरणं समोर आली होती. त्यामुळं कोरोनाला रोखण्यासाठी वुहाननं संपूर्म लोकसंख्येची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा-पाकिस्तानात लॉकडाऊनमध्ये तरुणींची वाईट अवस्था, अंगावर शहारे आणणारी आकडेवारी

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमधून कोरोनाचा उद्रेक होण्यात सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी कोरोनावर मात करण्यात चीनला यश आले. चीनमध्ये 82 हजार 918 कोरोनाची प्रकरणे समोर आली होती. मात्र त्यातील 78 हजारहून अधिक लोकं निरोगी होती. त्यामुळं चीनमधील सर्व शहरांतील लॉकडाऊन हटवण्यात आला होता.

वुहानमध्ये सर्वात आधी जाहीर केला लॉकडाऊन

चीनमध्ये सर्वात आधी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. हा लॉकडाऊन हुबई प्रांतातील वुहान या शहरात पहिल्यांदा लागू करण्यात आला. याचे कारण म्हणजे कोरोनाची सुरुवात या शहरातून झाली. मार्च अखेरीस वुहानमधील लॉकडाऊन शिथिल करण्यात आला.

वाचा-अमेरिकेचा सर्वात मोठा खुलासा, चीन आणि WHOचा असा होता कोरोना संदर्भातला प्लॅन

First published: May 13, 2020, 12:21 PM IST

ताज्या बातम्या