जगातील सर्वात मोठ्या रेफ्युजी कॅम्पमध्ये घुसला कोरोना, तब्बल 10 लाख लोकांचा जीव धोक्यात

जगातील सर्वात मोठ्या रेफ्युजी कॅम्पमध्ये घुसला कोरोना, तब्बल 10 लाख लोकांचा जीव धोक्यात

या सगळ्यात आता कोरोना जगातील सर्वात मोठ्या रेफ्युजी कॅम्पमध्ये जाऊन पोहचला आहे. बांगलादेशमध्ये असलेल्या रोहिंग्या कॅम्पमध्ये 2 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

  • Share this:

ढाका, 15 मे : कोरोनाव्हायरसनं संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 44 लाख 40 हजार 989 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यात आता कोरोना जगातील सर्वात मोठ्या रेफ्युजी कॅम्पमध्ये जाऊन पोहचला आहे. बांगलादेशमध्ये असलेल्या रोहिंग्या कॅम्पमध्ये 2 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

बांगलादेश शरणार्थी सहाय्य आयोगाचे अध्यक्ष मेहबूब आलम तालूकदार यांनी गुरुवारी सांगितले की कॉक्सो बाजारातील रेफ्युजी कॅम्पमध्ये दोन कोरोना रुग्ण आढळले आहेत. निर्वासित आणि आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना आयसोलेशन केंद्रात पाठवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी एजन्सीचे प्रवक्ते लुईस डोनोव्हन यांनी असोसिएटेड प्रेसला दिलेल्या माहितीत सांगितले की, दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. दोघांनाही क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांपैकी एक व्यक्ती रेफ्युजी कॅम्पमधील आहे तर दुसरा कॉक्स बाजार परिसरातील निवासी आहे.

वाचा-दारूची दुकानं बंद करण्यासाठी कोर्टात पोहोचले; त्यांनाच द्यावा लागला 1 लाखाचा दंड

मुख्य म्हणजे जगातील सर्वात मोठा रेफ्युजी कॅम्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात तब्बल 10 लाख रोहिंग्या मुसलमान राहतात. त्यामुळं सर्वांची चिंता वाढली आहे. दरम्यान रेफ्युजी कॅम्पमध्ये मुलभूत सुविधाही मिळत नसल्यामुळं येथे कोरोनाची प्रकरणं वाढू शकतात. मुख्य म्हणजे कॉक्स बाजार हा रहदारीचा परिसर आहे. अस्वच्छ व स्वच्छ पाण्याअभावी हा परिसरातील लोकं वाईट परिस्थितीत राहत आहेत. त्यामुळं इथं सामाजिक अंतरचे पालन करणं अवघड आहे.

वाचा-कोरोना नाही तर 'या' कारणामुळं होणार 12 लाख लहान मुलांचा मृत्यू, UNICEFचा खुलासा

एका अहवालानुसार, सुमारे 40 हजार लोकं या कॅम्पमध्ये राहतात आणि त्यांची लोकसंख्या घनता प्रति चौरस किलोमीटर (103600 प्रति चौरस मैल) लांब पसरली आहे. हे बांगलादेशच्या सरासरी घनतेच्या 40 पट आहे, येथे बांधलेली प्रत्येक झोपडी केवळ 10 चौरस मीटर (12 चौरस यार्ड) आहे ज्यामध्ये कमीतकमी 12 लोक एकत्र राहतात. त्यामुळं अशा परिसरात कोरोनाचा धोका सर्वात जास्त आहे.

वाचा-लॉकडाऊनचा मोठा झटका!3 मिनिटांच्या व्हिडीओ कॉलमध्ये गेली 3700 कर्मचाऱ्यांची नोकरी

First published: May 15, 2020, 3:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading