मनिला, 02 एप्रिल : जगभरात कोरोनाने हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यामुळे तब्बल 180 देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे असले तरी, लोकं ही गोष्टी गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळं अशा लोकांवर कारवाई करण्यात येत असताना एका देशातील राष्ट्रतींनी चक्क लॉकडाऊन तोडणाऱ्या लोकांना गोळ्या घालण्याचा फतवा काढला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी असा नियम काढणारा देश आहे फिलिपिन्स. फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांनी आपल्या सरकार, पोलिस आणि प्रशासनाला सांगितले आहे की जो कोणी कोरोना विषाणूमुळे लागू केलेल्या लॉकडाउनचे पालन करणार नाही त्यांना त्वरित गोळ्या घाला. राष्ट्रपतींनी हा फतवा काढल्यानंतर साऱ्या देशाचे रस्ते सामसुम झाले आहेत.
वाचा-लॉकडाऊनमध्येही गर्दी जमवण्याचा होता मौलानांचा प्लॅन? असा पसरला कोरोना
राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांनी आपल्या देशाच्या सुरक्षा दलाला सांगितले की हा संपूर्ण देशासाठी इशारा आहे. तर, सरकारच्या आदेशांचे अनुसरण करा. कोणत्याही आरोग्य सेवकाला, डॉक्टरला इजा करु नका. हा एक गंभीर गुन्हा असेल. म्हणूनच मी पोलिस आणि सुरक्षा दलाला आदेश देतो की ज्यांना लॉकडाऊनमध्ये अडचणी निर्माण होतात त्यांना त्वरित गोळ्या घाला, असेही सांगितले.
वाचा-24 तासात तब्बल 328 जणांना कोरोनाची लागण, देशात मृतांचा आकडा वाढताच
दरम्यान, रॉड्रिगो दुतेर्ते यांनी आपल्या देशवासियांना शुटींग करण्याचे आदेश देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही 2016-17 मध्ये राष्ट्रपतींनी कोणतीही कायदेशीर कारवाई न करता औषध विक्रेत्यांना ठार मारण्याचा आदेश दिला.
वाचा-...तर येत्या 7 दिवसांत मृतांचा आकडा आणखी वाढणार, WHOने व्यक्त केली भीती
फिलिपिन्समध्ये सध्या 2 हजार 311 पेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर, 96 लोकांचा मृत्यू झाला आहे. 12 मार्चच्या सुमारास, अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्टे यांनी देखील कोरोना विषाणूची तपासणी केली होती. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे. सावधगिरी म्हणून त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले होते. याशिवाय फिलिपिन्सची संसद आणि सेंट्रल बँकसुद्धा बंद ठेवण्यात आली होती.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.