Home /News /videsh /

अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक! वृद्धाश्रमात पडला मृतांचा खच, एकाचवेळी 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक! वृद्धाश्रमात पडला मृतांचा खच, एकाचवेळी 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू

मॅसेच्युसेट्स येथील वृद्धाश्रमात तब्बल 70 वृद्धांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कनंतर आता मॅसेच्युसेट्स कोरोनाचे केंद्र झाले आहे.

    मॅसेच्युसेट्स, 29 एप्रिल : अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अमेरिकेत दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सध्या 10 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत 58 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात सर्वात भयंकर परिस्थिती आहे ती वृद्धांची. मॅसेच्युसेट्स येथील वृद्धाश्रमामध्ये तब्बल 70 वृद्धांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कनंतर आता मॅसेच्युसेट्स कोरोनाचे केंद्र झालं आहे. सध्या राज्य आणि फेडरल अधिकारी आरोग्या सुविधेत काय चूक झाली ज्यामुळं हा उद्रेक झाला, याचा शोध घेत आहेत. मॅसेच्युसेट्स येथील होलीओके सोल्जियर्स होम येथे मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळं येथील रहिवाश्यांना योग्य आरोग्य सेवा मिळत नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान फेडरल अधिकारी चौकशी करत आहेत तर कायदेशीर कारवाई करायची की नाही याचा निर्णय राज्यातील सर्वोच्च वकील करीत आहेत. वाचा-महाराष्ट्राची मान शरमेनं झुकली, पालघरमध्ये घडली संतापजनक घटना होलीओके सोल्जियर्स येथील वृद्धांच्या नातेवाईकांनी या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली. गेल्या दोन दिवसांत येथील 3 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना झालेल्या रुग्णाचे वय हे 66 आणि त्यापुढील होते. दरम्यान, होलीओके सोल्जियर्स होमच्या अधीक्षक प्रशासकिय रजेवर होत्या. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर योग्यवेळी सेवा न पुवरल्याप्रकरणी आरोप केले आहेत. वाचा-कोरोनावर लस शोधणाऱ्या ऑक्सफर्डच्या टीममध्ये 'ही' भारतीय शास्त्रज्ञ होलीओके सोल्जियर्स होमच्या अधीक्षक बेनेट वॉल्श म्हणाले की, या महिन्याच्या सुरूवातीला राज्य अधिकाऱ्यांना माहित आहे की येथे कर्मचार्‍यांची कमतरता आहे. तरीही आरोग्य सुविधा योग्य वेळी मिळाल्या नाहीत. परिणामी येथील वृद्धांना आपला जीव गमवावा लागत आहे. दरम्यान, येथील कर्मचारी एकाच वेळी अनेकांना मदत करण्यासाठी सतत दुसर्‍या युनिटमध्ये जात असत आणि त्यामुळं कोरोनाचा प्रसार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. वाचा-आधी झाला कोरोना मग हृदय पडलं निकामी, मृत रुग्णाची अवस्था पाहून डॉक्टर झाले हैराण एकीकडे अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत 10 लाख 12 हजार 399 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर कोरोनाचं केंद्रबिंदू ठरलं आहे. अमेरिकेतील 30 टक्के कोरोना रुग्ण एकट्या न्यूयॉर्क शहरांत आहेत. तर न्यू जर्सी, मॅसेच्युसेट्स, कॅलिफोर्निया आणि पेनसिल्व्हानियामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या