मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोरोनाचा धोका : वुहाननंतर आता हा आहे व्हायरसचा नवा केंद्रबिंदू, या देशात सर्वाधिक मृत्यू

कोरोनाचा धोका : वुहाननंतर आता हा आहे व्हायरसचा नवा केंद्रबिंदू, या देशात सर्वाधिक मृत्यू

चीनच्या (china) वुहानमधून (wuhan) कोरोनाव्हायरसचा (coronavirus) उद्रेक झाला आणि संपूर्ण जगभरात हा व्हायरस पसरला. मात्र आता वुहाननंतर कोरोनाने आपला नवा केंद्रबिंदू बनवला आहे इराण (iran) आणि दक्षिण कोरियाला (south korea).

  • Published by:  Priya Lad

तेहरान, 25 फेब्रुवारी :  जगभरात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) 80,128 जणांना याची लागण झाली आहे , ज्यापैकी 77,658 प्रकरणं फक्त चीनमध्ये (china) आहेत तर 2700 जणांचा मृत्यू झाला आहे ज्यापैकी 2663 मृत चीनमधील आहेत. चीननंतर कोरोनाव्हायरसमुळे सर्वात जास्त मृत्यू कोणत्या देशात झाले असतील तो देश आहे इराण (iran) आणि सर्वात जास्त रुग्ण कोणत्या देशात असतील तर तो दक्षिण कोरिया (south korea).

कोरिया सेंटर्स ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियात 977 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली, दक्षिण कोरियातील सर्वात मोठं शहर Daegu इथं सर्वात जास्त प्रकरणं आहेत. इराणमध्ये आतापर्यंत 47 जणांना याची लागण झाली आहे. लागण झालेल्या रुग्णांच्या तुलनेत सर्वात जास्त म्हणजे 15 रुग्णांचा मृत्यू झालेत. आणि हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

इराणमुळे इतर देशांमध्ये पसरतोय कोरोनाव्हायरस

इराक, अफगाणिस्तान, बहरीन, कुवेत, ओमान, लेबनान, यूएई आणि कॅनडामध्ये आढळून आलेल्या कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचा इराणशी काही ना काही संबंध आहे. फक्त जानेवारीत जवळपास 30 हजार लोकं इराणहून अफगाणिस्तानात परतलेत. यातील 70 टक्के लोकं क्वोम शहरातून आलेत, जिथं कोरोनाव्हायरसचा सर्वात जास्त प्रभाव आहे. इराणहून संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका आहे. .

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली. चीनमध्ये कोरोनाव्हायरस नियंत्रणात असल्याचं जिनपिंग यांनी सांगितल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तसंच अमेरिका या व्हायरसशी लढण्याची पूर्णपणे तयार असल्याचंही ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प सध्या भारत दौऱ्यावर आहेत.

First published:

Tags: China, Coronavirus, Iran, South korea