Coronavirus मुळे एका मिनिटात चीन नष्ट करणार 84 हजार कोटींच्या नोटा

Coronavirus मुळे एका मिनिटात चीन नष्ट करणार 84 हजार कोटींच्या नोटा

कोरोनाव्हायरस (Coronavirus) या भयंकर विषाणूमुळे आतापर्यंत जगभरातील 71 हजार 326 लोक आजारी आहेत. तर जवळजवळ 1700 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

वुहान, 17 फेब्रुवारी : कोरोनाव्हायरस (Coronavirus) या भयंकर विषाणूमुळे आतापर्यंत जगभरातील 71 हजार 326 लोक आजारी आहेत. यातील 70 हजार 548 लोक एकट्या चीनमधील आहेत. या भयंकर आजाराने आतापर्यंत 1 हजार 775 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता चीनसमोर एक नवीन समस्या येऊन उभी राहिली आहे. कोरोनाव्हायरसमुळे चीनला जवळ जवळ 84 हजार कोटींच्या नोटा नष्ट करावा लागणार आहे.

चीनमध्ये मिनिटाला एका व्यक्तिचा या व्हायरसमुळे मृत्यू होत असताना आता लोकांचे हात लागून बाजारात आलेल्या नोटांचा बंदोबस्त चीनला करायचा आहे. यासाठी याआधी चीनने कोट्यावधी नोटा बदलल्या आहेत. मात्र आता 84 हजार नोटा एकत्र जाळून टाकल्या जाणार आहेत.

वाचा-Coronavirus : दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढताच, आतापर्यंत 1700 जणांचा मृत्यू

पीपल्स बँक ऑफ चायना (PBOC) यांनीही कागदाच्या बनावटीच्या सर्व नोटा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. नोटबंदीची किती चायना नष्ट करणार आहे, याबाबत अधिका माहिती मिळालेली नाही आहे. केंद्रीय बँकेने 17 जानेवारीपासून देशभरात 600 अब्ज युआनच्या (सुमारे 6.11 लाख कोटी रुपये) नवीन नोटा जारी केल्या आहेत, असे सेंट्रल बँकेचे डेप्युटी गव्हर्नर फॅन यैफी यांनी सांगितले. त्यापैकी 4 अब्ज युआनच्या (सुमारे 2 हजार 581 कोटी रुपये) नवीन नोटा केवळ वुहानमध्ये पाठविल्या गेल्या आहेत.

वाचा-महिलांनी गर्भवतीला खांद्यावरुन नेले रुग्णालयात, 8 तास 18 मिनिटांचा प्रवास

सेंट्रल बँकेकडून येत्या काही दिवसात जानेवारीपासून बाजारात पाठविल्या गेलेल्या नोटा जमा केल्या जातील. त्यानंतर या नोटा अल्ट्राव्हायोलेट किरणांनी साफ केल्या जातील. त्यांना 14 दिवस वेगळे ठेवले जाईल, त्यानंतर या नोटा बाजारात उपलब्ध असतील.

वाचा-VIDEO : 8 वर्षांची चिमुरडी झाली 80 वर्षांची, ‘या’ भयंकर आजारामुळे झाला मृत्यू

तर, चीनने वुहान आणि चीनच्या दक्षिणेकडील राज्यांना 84 हजार 321 कोटी रुपयांच्या कागदी नोटा पाठविल्या आहेत, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. या नोटा आता नष्य केल्या जातील. त्यापैकी 55,740 कोटी रुपये दक्षिणेकडील राज्यांना पाठविण्यात आले. सर्वात मोठी समस्या म्हणजे सेंट्रल बँकेने सर्व लोकांना जुन्या कागदी नोटा बँकेत जमा करण्याची विनंती केली आहे जेणेकरून ते नष्ट होऊ किंवा तुरुंगात जावेत. म्हणजेच जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात नष्ट केल्या जाऊ शकतात.

व्हायरसमुळे 1700 लोकांचा मृत्यू

शभरात अनेकांना या व्हायसरमुळे आपला जीव गमवावा लागत आहे. अनेकांना या व्हायरसची लागण झाल्याने अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यातच आता चीनमधील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. lतर आणखी 70 हजार जणांना या व्हायरसची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे. तर दुबईमध्ये व्हायरसने बाधित नवे 1 हजार 933 रुग्ण समोर आले आहेत.

First published: February 17, 2020, 1:09 PM IST

ताज्या बातम्या