न्यूयॉर्क, 10 एप्रिल : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये नियम कडक केले आहे. याआधी काही देशांमध्ये लॉकडाऊन तोडल्यास गंभीर गुन्हे नोंदवले जात होते. आता अमेरिकेत एक वेगळाच फतवा काढण्यात आला आहे. अमेरिकेने कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी शिंकल्यास, त्या व्यक्तीवर दहशतवाद पसरवल्याचा गुन्हा दाखल केल्याची घटना घडली.
अमेरिकेच्या व्हर्जिनिया शहरात एका व्यक्तीने दुकानातून सामान खरेदी केल्यानंतर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दुकानदाराने पोलिसांना बोलवल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने पोलिसांना तुमच्यावर शिंकेन, अशी धमकी दिली. या व्यक्तीविरूद्ध दहशत पसरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा-ठाणेकरांनो आता बस करा! कोरोनाचा कहर झाल्यावर तुम्ही ऐकणार का
दरम्यान, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे एका सुपरमार्केटमध्ये एक महिला शिंकली म्हणून लाखोंचे सामना फेकून देण्यात आले होते. त्यानंतर या एका महिलेस अटक करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रसार अमेरिकेत वाढल्यामुळे नियम कडक करण्यात आले आहेत. सध्या अमेरिकेत 4 लाख 69 हजार 021 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, आतापर्यंत 16 हजार 675 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
वाचा-'या' कारणामुळे ब्रिटिश High Commission ने केलं ठाकरे सरकारचं कौतुक
न्यूयॉर्कमध्ये मृतदेहांसाठी नाही जागा
कोरोनामुळे न्यूयॉर्कमध्ये भीषण परिस्थिती आहे. न्यूयॉर्कमध्ये मृतदेह पुरण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे लोकांना वाहनांमध्ये मृतदेह ठेवावे लागत आहे. न्यूयॉर्कमध्ये एका लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, तब्बल 6 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या वुहाननंतर आता न्यूयॉर्क कोरोनाचे नवीन केंद्र झाले आहे.