मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चोराच्या उलट्या बोंबा! कोरोना व्हायरस भारतात तयार झाला; चीनी संशोधकांचा दावा

चोराच्या उलट्या बोंबा! कोरोना व्हायरस भारतात तयार झाला; चीनी संशोधकांचा दावा

चीनने उलटा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. आता चीनच्या एका संशोधकाने, लडाख सीमेवरील तणावादरम्यान, कोरोना व्हायरस भारतातून पहिल्यांदा जगभरात पसरला असल्याचा आरोप केला आहे.

चीनने उलटा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. आता चीनच्या एका संशोधकाने, लडाख सीमेवरील तणावादरम्यान, कोरोना व्हायरस भारतातून पहिल्यांदा जगभरात पसरला असल्याचा आरोप केला आहे.

चीनने उलटा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. आता चीनच्या एका संशोधकाने, लडाख सीमेवरील तणावादरम्यान, कोरोना व्हायरस भारतातून पहिल्यांदा जगभरात पसरला असल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना, चीनने या महामारीच्या स्त्रोताबाबत भ्रम पसरवण्यास सुरुवात केली आहे. चीन सरकारने मागील काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, वुहानमध्ये कोविड-19 पसरल्यामुळे ही महामारी इटलीसह जगातील इतर देशात पसरली. पण आता चीनने उलटा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. आता चीनच्या एका संशोधकाने, लडाख सीमेवरील तणावादरम्यान, कोरोना व्हायरस भारतातून पहिल्यांदा जगभरात पसरला असल्याचा आरोप केला आहे.

भारतात 2019 मध्ये उन्हाळ्यात कोरोनाची सुरूवात झाली -

चीन ऍकॅडमी ऑफ सायन्स वैज्ञानिकांच्या एका टीमने सांगितलं की, कोरोना व्हायरस भारतात 2019 मध्ये उन्हाळ्यात निर्माण झाला. याच चीनी टीमने दावा केला की, कोरोना व्हायरस प्राण्यांपासून दूषित पाण्याच्या माध्यमातून माणसामध्ये पसरला. त्यानंतर तो वुहान पोहचला, जेथे कोरोना व्हायरसची पहिल्यांदा ओळख झाली. चीनी टीमने फिलोजेनेटिक (कोरोना व्हायरसच्या म्यूटेट होण्याच्या पद्धतीचा अभ्यास) विश्लेषणाचा आधार घेतला, जेणेकरून कोरोना व्हायरसच्या स्त्रोताची माहिती मिळेल. इतर सर्व कोशिकांप्रमाणे व्हायरसही म्यूटेट होता आणि त्यानंतर तो निर्माण झाला. या दरम्यान त्यांच्या डीएनएमध्ये हलका बदल होतो. ज्या व्हायरसचं म्यूटेशन अतिशय कमी असतं, त्याची माहिती घेऊन, कोरोनाच्या स्त्रोताची माहिती मिळवता येऊ शकते, असा दावा चीनने केला आहे.

वुहानमध्ये आढळलेला कोरोना व्हायरस खरा-असली व्हायरस नव्हता -

चीनी संशोधकांनी या पद्धतीचा वापर करत वुहानमध्ये आढळलेला कोरोना व्हायरस असली-खरा व्हायरस नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की तपासामध्ये कोरोना व्हायरस बांगलादेश, अमेरिका, इटली, भारत, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, रशिया किंवा सर्बियामध्ये निर्माण झाल्याचे संकेत मिळाले आहेत. भारत आणि बांगलादेशातूव सर्वात कमी म्यूटेशन असणारे नमुने मिळाले आहेत आणि हे चीनचे शेजारी देश आहेत. त्यामुळे सर्वात आधी संक्रमण तेथे झाल्याची शक्यता आहे. व्हायरसच्या म्यूटेशनसाठी लागणारा कालावधी आणि या देशातून घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या आधारे चीनी संशोधकांनी दावा केला की, कोरोना व्हायरस जुलै किंवा ऑगस्टमध्ये 2019 मध्ये पहिल्यांदा चीनमध्ये पसरला.

(वाचा - कोरोना लशीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; म्हणाले...)

भारतात अनेक महिने पसरत राहिला कोरोना व्हायरस -

चीनी संशोधकांनी सांगितलं की, पाण्याच्या कमतरतेमुळे जंगली माकडासारखए प्राणी, पाण्यासाठी बाहेर येतात. यामुळे निश्चितपणे माणूस आणि जंगली प्राण्यांच्या संपर्काचा धोका वाढतो. प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरण्याचं कारण असामान्य गरमी हे असल्याचंही ते म्हणाले. भारतातील खराब आरोग्य व्यवस्था आणि तरुणांची मोठी लोकसंख्या यामुळे हा व्हायरस अनेक महिन्यांपर्यंत विना ओखळ पसरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरस युरोपमार्गे आल्याचा दावाही चीनने केला आहे. त्यामुळे ही माहामारी हा केवळ याचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलंय.

चीनचे खोटे दावे इतर संशोधकांनी मोडून काढले -

यादरम्यान, चीनी संशोधकांचे हे खोटे दावे इतर संशोधकांनी खोडून काढले आहेत. ब्रिटेनचे ग्लासगो यूनिव्हर्सिटीचे एक विशेषज्ञ डेविड रॉबर्ट्सनने डेली मेलशी बोलताना सांगितलं की, चीनी शोध अतिशय दोषपूर्ण आहे. हे असं पहिल्यांदा झालं नाही की, चीनने वुहानऐवजी कोरोना व्हायरससाठी इतर देशांवर आरोप केले आहेत. चीनने कोणत्याही पुराव्याशिवाय इटली आणि अमेरिकेवर कोरोना पसरवण्याचे आरोप लावले आहेत.

ज्यावेळी लडाख खोऱ्यात भारत आणि चीनदरम्यान संघर्ष सुरू झाला, त्यावेळी चीनी संशोधकांनी भारतावर कोरोना व्हायरस पसरवण्याचे आरोप लावले. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO च्या पुराव्यात कोरोना चीनमध्ये निर्माण झाल्याचं समजलं आहे. WHO ने आपली टीम याच्या तपासणीसाठी चीनमध्ये पाठवली आहे.

First published:

Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus