कोरोनाने व्यापलं जग, बाधितांची संख्या 3 लाखांवर तर मृत्यूने पार केला 13 हजारांचा आकडा

कोरोनाने व्यापलं जग, बाधितांची संख्या 3 लाखांवर तर मृत्यूने पार केला 13 हजारांचा आकडा

चीन, इटली, अमेरिका, स्पेन आणि जर्मनी हे कोरोनाग्रस्त 5 टॉप टेन देश आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 22 मार्च: सर्व जगात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढतोय. तर मृत्यू पडणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. कोरोनाने अख्ख जगच व्यापलं आहे. महाकाय चीनपासून ते बलाढ्य अमेरिकेपर्यंत सर्वच देश कोरोनाने ग्रासले आहेत. कोरोनामुळे बाधित असलेल्यांची रविवारी 4 वाजेपर्यंतची संख्या 3 लाख 7 हजार 341 असल्याची माहिती जगविख्यात Johns Hopkins University ने दिली आहे. तर मृत्यूने 13 हजारांचा आकडा पार केलाय. चीन, इटली, अमेरिका, स्पेन आणि जर्मनी हे कोरोनाग्रस्त 5 टॉप टेन देश आहेत.

अशी आहे आकडेवारी

81,393 China

53,578 Italy

26,747 US

25,496 Spain

22,364 Germany

कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात (India) 31 मार्चपर्यंत काही सेवा बंद ठेवण्यात आल्यात, लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो आहे. असाच बंदचा निर्णय (Britain) सरकारनेही घेतला आहे. मात्र ब्रिटनने काही विशेष लोकांना तब्बल 3 महिने घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे.

जनता कर्फ्यूमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबणार नाही, तज्ज्ञांचा दावा

ब्रिटनमध्ये 5000 पेक्षा जास्त प्रकरणं समोर आलीत, तर 233 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती पाहता ब्रिटन सरकारने काही विशेष अशा 15 लाख लोकांना 3 महिन्यांपर्यंत घरात राहण्याचा सल्ला दिला आहे.  या 15 लाख नागरिकांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे, ज्यांना हाडांचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर, सिस्टिक फायब्रोसिससारखे गंभीर आजार आहेत आणि ज्यांनी नुकतंच अवयव प्रत्यारोपण करून घेतलेलं आहे.

कम्युनिटी सेक्रेटरी रॉबर्ट जेनरिक यांनी सांगितल की, अशा लोकांनी घरात राहायला हवं, जेणेकरून वैद्यकीय सेवेवर भार येणार नाही आणि अनेकांचा जीव वाचेल.

बापरे! 'हे' राज्य Corona च्या तिसऱ्या टप्प्यात, कम्युुनिटीतून व्हायरसचा प्रसार

रॉबर्ट म्हणाले, जे लोक आधीपासून आजारी आहेत त्यांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त आहे, अशा लोकांनी जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे, असं सरकारनं सांगितलेलं आहे.

ज्यांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त आहे, अशा सर्वांना शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी मिळून अशा लोकांना शोधलं आहे. त्यांना कमीत कमी 12 आठवडे घरात राहण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय घरात कसली गरज भासल्यास एक फोन नंबरही जारी करण्यात आला आहे. फोन करून ही लोकं काहीही ऑर्डर करू शकतात.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2020 04:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading