मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

नवजात बाळालाही Coronavirus, विषाणूची लागण झालेला सर्वात कमी वयाचा रुग्ण

नवजात बाळालाही Coronavirus, विषाणूची लागण झालेला सर्वात कमी वयाचा रुग्ण

लंडनमध्ये (London) नवजात बाळाला (new born baby) कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे.

लंडनमध्ये (London) नवजात बाळाला (new born baby) कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे.

लंडनमध्ये (London) नवजात बाळाला (new born baby) कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे.

    लंडन, 14 मार्च : लंडनमध्ये (London) नवजात बाळाला (new born baby) कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. या महाभयंकर विषाणूची लागण झालेला, जगातील हा सर्वात कमी वयाचा रुग्ण असल्याचं म्हटलं जातं आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, या बाळाच्या आईला सुरुवातीला आपल्या बाळाला न्युमोनिया झाला असं वाटलं. मात्र वैद्यकीय चाचणीत त्याला कोरोनाव्हायरस झाल्याचं निदान झालं. आई आणि बाळ दोघांवरही वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे वाचा - कोरोना प्रभावित देशातून आलेले 335 प्रवासी बेपत्ता, तपासणी न केल्याने धोका वाढला हे बाळ गर्भात असताना की जन्मानंतर त्याला कोरोनाव्हायरस झाला, याचा तपास आता डॉक्टर करत आहे. आई आणि बाळाची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेगळं ठेवण्यात आलं आहे. इंग्लंडमध्ये एकूण 798 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्येही नवजात बाळाला झाला होता कोरोना दरम्यान फेब्रुवारीमध्येदेखील एका नवजात बाळाला कोरोनाव्हायरसचं निदान झालं आहे. चीनच्या वुहानमध्ये बाळ जन्मल्याच्या 30 तासांमध्येच त्याला विषाणूची लागण झाली. चीनच्या अधिकृत माध्यमांनी ही माहिती दिली होती. हे नवजात आतापर्यंत सर्वात संक्रमित रुग्ण आहे. या संसर्गामुळे चीनमध्ये 563 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - 'कोरोना'वर मात केलेल्या रुग्णाला पुन्हा व्हायरसची लागण होऊ शकते का? मीडिया रिपोर्टनुसार, नवजात आईच्या गर्भाशयात किंवा जन्मानंतर लगेचच संसर्ग होण्याची शक्यता आहे. नवजात मुलास जन्म देण्यापूर्वी आईचा अहवालही सकारात्मक आला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे 'व्हर्टिकल ट्रान्समिशन' चे प्रकरण असू शकते, ज्यामध्ये गरोदरपणात किंवा जन्मानंतर संक्रमित आईपासून मुलापर्यंत संसर्ग पसरतो. भारतात 3 वर्षाचा चिमुरडा कोरोनाग्रस्त केरळमधील कोची येथील 3 वर्षांचा मुलगा कोरोनाग्रस्त आहे.  पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेला हा मुलगा आपल्या पालकांसोबत इटलीला गेला होता. 7 मार्च रोजी इटलीहून हा मुलगा आपल्या पालकांसोबत दुबईला आला, त्यानंतर कोचीला आल्यानंतर विमानतळावर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रिपोर्टनुसार तीन वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे वाचा - Google इंजिनीअरच्या बायकोलाही कोरोना; Quarantine च्या सल्ल्यानंतरही केला प्रवास
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या