नातेवाईकांशी शेवटचं बोलून घ्या! मृत्यूच्या दारात कोरोनाग्रस्तांना मेडिकल स्टाफ देतोय मोबाईल

हॉस्पिटल्सच्या दारावर पहिल्यांदा लिहिलेलं की कोरोनाग्रस्ताला भेटण्यासाठी दोघांना प्रवेश पण नंतर एकालाच असं म्हटलं आणि शेवटी एकाला प्रवेश मिळेल पण मरणार असाल तरच... इतकी भीषण परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झाली आहे.

हॉस्पिटल्सच्या दारावर पहिल्यांदा लिहिलेलं की कोरोनाग्रस्ताला भेटण्यासाठी दोघांना प्रवेश पण नंतर एकालाच असं म्हटलं आणि शेवटी एकाला प्रवेश मिळेल पण मरणार असाल तरच... इतकी भीषण परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झाली आहे.

  • Share this:
    लंडन, 08 एप्रिल : कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. दररोज हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत.  या लोकांच्या अनेक हृदयद्रावक कहाण्या समोर येत आहेत. इटली, स्पेननंतर ब्रिटनमध्येही कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. कोरोनाग्रस्तांची अवस्था अतिशय हालाखीची आहे. ब्रिटनमधील हॉस्पिटल कोरोनाच्या रुग्णांनी भरली आहेत. यात काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. डॉक्टर आणि नर्स या परिस्थितीतही धैर्याने आणि संयमाने काम करत आहेत. मात्र रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या वेदनेवर एक छोटीशी फुंकर का होईना डॉक्टर आणि नर्स घालत आहेत. ब्रिटनमधील हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात असलेल्या कोरोना रुग्णांना मेडिकल स्टाफ स्वत:चे मोबाइल देत आहे. ज्यावरून कोरोना झालेले रुग्ण जे मृत्यूशय्येवर आहेत त्यांना कुटुंबियांशी शेवटचं बोलता येईल. ब्रिटनमधील एका वेबसाइटने standerd.co.uk ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असलेल्या हॉस्पिटलच्या दारावर लिहलेलं आहे की, एका वेळी दोनच लोकांना भेटण्यास परवानगी आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी लिहिलेली ही ओळ बदलून तिथं फक्त एकालाच प्रवेश दिला जाईल असं लिहिण्यात आलं. त्यानंतर शेवटी तर असं लिहिलं की एकालाच प्रवेश तोसुद्धा तुम्ही मरत असाल तरच... ब्रिटनच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांसोबत इतरांना येण्याची परवानगी नाही. रुग्णांच्या कुटुंबियांपैकी कोणी संक्रमित असेल किंवा त्यांना इनक्युबेटर्समध्ये ठेवलं जातं. यामुळे व्हायरसच्या प्रादुर्भावापासून वाचवता येतं. हॉस्पिटल्समध्ये पुरेशी प्रोटेक्शन इक्वीपमेंट नाहीत. जर तुमचं नशिब असेल तर पीपीई घालून मृत्यूच्या दारात असेल्या नातेवाईकाला पाहता येतं ही सोय काहीच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. इतर रुग्णालयात मृत्यू होणाऱ्या रुग्णांना मेडिकल स्टाफ त्यांच्या फोनवरून नातेवाईकांशी शेवटचं बोलणं करून देतात. कोरोनाच्या एका संशयित रुग्णानं त्याचा अनुभव सांगितंला आहे. त्यानं म्हटलं की, मी माझ्या वडिलांच्या पार्टनरला विचारलं की तुम्ही त्यांना आयफोन देऊ शकता का आणि तो चालवायचा कसा हे शिकवाल का? कारण जर ते रुग्णालयात दाखल झाले तर त्यांना स्वत:च फोन चालवावा लागेल. हे वाचा : 'एकवेळ अन्न नको पण मास्क द्या', कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांची आर्त हाक रुग्ण म्हणाला की, गेल्या आठवड्यात मला कोरोनाची लक्षणं असल्याचं निदान झालं. मला घरीही जाता येणार नव्हतं. त्यानंतर मला समजत नव्हतं की काय करावं. पुढे मला एका अशा ठिकाणी पाठवलं जिथं स्वॅबची टेस्ट झाली आणि रिझल्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर मला स्वस्थ वाटायला लागलं आणि मी इतरांसाठी धोकादायक नसल्यानं सुटकेचा निश्वास टाकला. हे वाचा : कोरोनाच्या एका रुग्णानं संपूर्ण देशाला भरली धडकी, तब्बल 3 कोटी लोकं क्वारंटाइन संपादन - सुरज यादव
    First published: