Coronavirus चा होणार फायदा! 75 हजार जणांचा जीव वाचेल असा संशोधकाचा दावा

Coronavirus चा होणार फायदा! 75 हजार जणांचा जीव वाचेल असा संशोधकाचा दावा

कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास 10 हजार जणांना जीव गमावावा लागला आहे. तर जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउनची परिस्थिती आहे.

  • Share this:

कॅलिफोर्निया, 20 मार्च : कोरोना व्हायरसची धास्ती जगभरातील अनेक देशांनी घेतली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास 10 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. याचा प्रभाव संपूर्ण जगभर दिसत असताना एक नवं संशोधन समोर आलं आहे ज्यामुळे कोरोनाचा फायदा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी लॉकडाउन केलं आहे. यामुळे प्रदुषणाचं प्रमाण कमी झालं आहे. चीनमध्ये आकाश निरभ्र दिसत आहे. इटलीत व्हेनिसमधील कालव्यात पाणी स्वच्छ झालं आहे. त्यामध्ये डॉल्फिन पोहोतोना दिसत आहेत. नायट्रोजनचं प्रमाण चीनमध्ये कमी झाल्याचंही म्हटलं आहे.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अर्थ सिस्टिम सायन्स विभागाने हे संशोधन केलं. प्राध्यापक मार्शल बर्क यांनी सांगितलं की, चीनमध्ये कोरोनामुळे लॉकडाउन कऱण्यात आलं. त्यामुळे जवळपास 50 ते 75 हजार लोकांचे वेळेआधी होणारे मृत्यू वाचले. प्रदुषणाची पातळी पहिल्यासारखी असती तर या वर्षाच्या शेवटी इतक्या लोकांना प्राण गमवावे लागले असते.

मार्शल बर्क यांनी सांगितलं की, चीनमध्ये लॉकडाउन झाल्यानंतर कोरोनामुळे मरणाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत 20 पट जास्त लोकांचे जीव वाचले आहेत. वायु प्रदुषण आणि वेळे आधी मृत्यू यांचा जुना संबंध आहे. दोन महिन्यांपर्यंत स्वच्छ हवा मिळाल्यानं 5 वर्षांपेक्षा कमी वयाची 4 हजार मुले आणि 70 वर्षांपेक्षा जास्त वयापेक्षा कमी 50 ते 70 हजार लोकांचे जीव वाचले.

हे वाचा : कोरोनाची झळ आता सामान्यांच्या खिशाला, 'या' 7 गोष्टी महागणार

चीनच्या पर्यावरण मंत्रालयानेही ही गोष्ट मान्य केली की, वुहान ज्या ठिकाणी आहे त्या हुबेही प्रांतात फेब्रुवारी महिन्यात हवेच्या गुणवत्तेत 21.5 टक्के वाढ झाली. इतकंच काय नासाने घेतलेल्या सॅटेलाइट फोटोवरूनही कोरोनामुळे लॉकडाउन केल्यानंतर वातावरणात झालेला फरक दिसून येतो.

हे वाचा : बापरे! भारतात कम्युनिटीमार्फत कोरोनाचा प्रसार? रुग्णाचा स्रोतच सापडला नाही

दरम्यान, इटलीतील व्हेनिस शहरही कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्याठिकाणी जवळपास एका महिन्याला 50 लाख पर्यटक भेट देतात. आता पर्यटकांची संख्या कमी झाल्यानं व्हेनिसच्या कालव्यात नाव, बोट यामुळे होणारं प्रदुषण कमी झालं आहे. आता तिथं डॉल्फिन उड्या मारताना दिसतात. तसंच पाणीही स्वच्छ झालं आहे.

व्हेनिस शहराच्या महापौरांच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, लॉकडाउनमुळे कालव्यातील प्रदुषण कमी झालं. व्हेनिसमध्ये पर्यटकांची संख्या प्रमाणाबाहेर असते. यामुळे अनेक महिन्यांनी इथलं वातावरण नॉर्मल झालं आहे.

हे वाचा : केरळमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक 12 जणांना ‘कोरोना’ची लागण, देशातली संख्या 223वर

First published: March 20, 2020, 10:18 PM IST

ताज्या बातम्या