कोरोनामुळे हाहाकार, वाचा जगभरातील अपडेट आकडेवारी

कोरोनामुळे हाहाकार, वाचा जगभरातील अपडेट आकडेवारी

एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दुप्पट वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : चीनच्या वुहान शहरापासून वेगानं संसर्ग होत गेलेला कोरोना व्हायरस आता थांबण्याचं नाव घेत नाहीय. एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दुप्पट वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 200 हून अधिक देशांमध्ये याचा मोठा फटका बसला आहे. सर्वात जास्त धोका युरोपीय देशांना असून आतापर्यंत या व्हायरसमुळे युरोपमध्ये 70 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन या देशांमध्ये कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात 1 लाख 20 हजार लोकांचा मृत्यू या व्हायरसमुळे झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेत 25 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसमुळे मृत्यू झालेला रुग्णांच्या संख्येतील अमेरिका पहिल्या क्रमांकवर आहे. नवीन आकडेवारीनुसार अमेरिकेत 24 तासांत 2,228 लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये 762 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा आकडा 15, 729 वर पोहोचला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्याा माहितीनुसार जगभरात ह्या व्हायरसमुळे आतापर्यंत 1,23,783 लोकांचा मृत्यू झाला असून 19,68,943 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी 30 एप्रिलपर्यंत किंवा एक महिना लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा-मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काही तासांत काँग्रेस आमदार कोरोना पॉझिटिव्ह

भारतातील आकडेवरी काय आहे...

भारतातही एप्रिल महिन्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगानं पसरत आहे. देशभरात 14 एप्रिलपर्यंत COVID-19 चे 1211 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे भारतातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 10,815 झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 353 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 1190 जणांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. ते बरे होऊन घरी परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाव्हायरचा वाढता धोका लक्षात घेत देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा-लॉकडाऊननंतर 8 तासांची शिफ्ट वाढण्याची शक्यता, कायद्यात बदल करण्याबाबत विचार सुरू

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 15, 2020, 7:15 AM IST

ताज्या बातम्या