लंडन, 08 एप्रिल : जगात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे लोक घरातच अडकले आहेत. या लोकांना अत्यावश्यक असल्याशिवाय घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. जेव्हा घरातील सामान संपलं असेल तर लोक घरातून बाहेर पडतात. त्यासाठी एक वेळही ठरवून देण्यात आली आहे. दरम्यान, तरीही काही लोक ऐकत नाहीत. एक व्यक्ती फक्त एक युरो म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 83 रुपये वाचवण्यासाठी 386 किमी दूर गेला. त्यासाठी तो गाडी घेऊन गेला होता.
इंडिया टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये एक कार 177 किमी वेगानं जात होती. देशात लॉकडाउन केलं असतानाही इतक्या वेगानं जात असलेल्या गाडीमुळे वाहतुक निरीक्षकही चक्रावले. हे तर लॉकडाऊनचं थेट उल्लंघन होतं. संबंधित व्यक्ती नॉटिंगहमहून लंडनला ब्रेड आणण्यासाठी जात होती. एवढ्यासाठीच की तिथं फक्त एक युरोने ब्रेड स्वस्त आहे.
Just stopped a car doing 110mph on the M1 north. The purpose of the journey from Nottingham? To buy bread in London because it was £1 cheaper. He also had his 2 young children in the car! Reported to court. #thatcouldcostsomedough#StayAtHomeSaveLivespic.twitter.com/LX4TmEM4i5
— Leicestershire Roads Policing Unit (RPU) (@LeicsPoliceRPU) April 5, 2020
पोलिसांनी जेव्हा त्या व्यक्तीला पकडलं तेव्हा त्याची दोन मुलंही सोबत होती. Leicestershire Roads Policing Unit ने याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे. व्यक्तीला पकडलं पण पोलिस त्यानं सांगितलेल्या कारणाने चक्रावलेसुद्धा आणि हसावं की रडावं हेसुद्धा समजेना. कारण एक युरो वाचवण्यासाठी त्यापेक्षा जास्त पेट्रोल किंवा गॅस त्या व्यक्तीनं खर्च केला असेल.
लोकांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यावर भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी असं करणाऱ्या व्यक्तीला डबल दंड करायला हवा असंही म्हटलं आहे. याशिवाय 80 रुपयांसाठी कोणी इतकं किलोमीटर गाडीनं जातं का असाही प्रश्न उपस्थित करत जाणारा मुर्ख असेल असंही म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात फ्रान्समधील एक व्यक्ती सिगारेटसाठी दुसऱ्या देशात गेल्याचं समोर आलं होतं.