इराणमध्ये कोरोना मृत्यूचं थैमान! सर्वोच्च संस्थेतल्या धार्मिक नेत्याचा Coronavirus ने घेतला बळी

इराणमध्ये कोरोना मृत्यूचं थैमान! सर्वोच्च संस्थेतल्या धार्मिक नेत्याचा Coronavirus ने घेतला बळी

इराणचा सर्वोच्च नेता निवडण्याचा अधिकार असलेल्या धार्मिक संस्थेचे 78 वर्षीय सदस्य अयातुल्ला हाशीम बाथेई यांचं Covid-19 च्या संसर्गाने निधन झाल्याचं वृत्त आहे.

  • Share this:

तेहरान, 16 मार्च : चीननंतर Coronavirus ने थैमान घातलेला प्रदेश म्हणजे इराण. या देशातल्या अनेक महत्त्वाच्या आणि उच्चपदस्थ व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. इराणचा सर्वोच्च नेता निवडण्याचा अधिकार असलेल्या धार्मिक संस्थेचे 78 वर्षीय सदस्य अयातुल्ला हाशीम बाथेई यांचं Covid-19 च्या संसर्गाने निधन झाल्याचं वृत्त आहे.

इराणी वृत्तसंस्था तस्नीमने दिलेल्या बातमीनुसार  'मजिलसे खबरगाने रहबरी' चे सदस्य अयातुल्ला बाथेई या वरिष्ठ धार्मिक नेत्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. बातमीनुसार  'मजिलसे खबरगाने रहबरी' ही धर्मसंस्था या देशावर राज्य करणारा सर्वोच्च नेता निवडते.

वाचा - म्हणे ‘कोरोना म्हणजे अल्लाहने दिलेली शिक्षा’; त्याच धर्मगुरूला व्हायरसचा विळखा

इराणमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासांत या व्हायरसच्या संसर्गाने 129 लोकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे या नव्या व्हायरसच्या संक्रमणाने मृत्यू झालेल्या इराणी लोकांची संख्या 853 झाली आहे. सुमारे 14000 हून अधिक इराणी जनतेला या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

इराणने केले अमेरिकेवर आरोप

इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद जरीफ यांनी इराणमधल्या कोरोना कहरासाठी अमेरिकेला जबाबदार धरलं आहे. रविवारी त्यांनी दिलेल्या निवेदनात अमेरिकेने लादलेले निर्बंध याला जबाबदार असल्याचं म्हटलं. इराणमध्ये कोरोनाचे जास्त बळी जात आहेत कारण हे निर्बंध आहेत, असं त्यांनी म्हटलं.

अन्य बातम्या

Coronavirus ची जगभरातली खरी आणि ताजी माहिती एका क्लिकवर; Covid-19 ट्रॅकर लाँच

SAARC कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या पाकच्या प्रतिनिधीनेच केलं मास्कचं स्मगलिंग?

First published: March 16, 2020, 6:56 PM IST

ताज्या बातम्या