हवेतूनही पसरतो कोरोनाव्हायरस! 32 देशांच्या 239 वैज्ञानिकांनी केला दावा पण...

हवेतूनही पसरतो कोरोनाव्हायरस! 32 देशांच्या 239 वैज्ञानिकांनी केला दावा पण...

कोरोनाबाबत 32 देशांतील 239 वैज्ञानिकांनी एक खुले पत्र लिहिले आहे, ज्यात WHOच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • Share this:

वॉशिंग्टन, 06 जुलै : जगात कोरोनाचा कहर थांबता थांबत नाही आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रसार नक्की चीनमधून झाला की नाही? याचा शोध सध्या जागतिक आरोग्य संघटना घेत आहेत. कोरोनाव्हायरसच्या बाबतीत चीनला मदत केल्याच्या आरोपाचा सामना करणारी WHO आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोरोनाबाबत 32 देशांतील 239 वैज्ञानिकांनी एक खुले पत्र लिहिले आहे, ज्यात WHOच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की कोरोनाव्हायरस हवेतूनही पसरतो, परंतु WHO याबद्दल गंभीर नाही आहे, असा आरोप या वैज्ञानिकांनी केला आहे.

न्यूयॉर्क टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, 239 शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे, हवेतील छोट्या कणांमुळे कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की त्यांना याचा पुरावा मिळाला आहे आणि त्यांनी WHO ला या आजारा संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे.

वाचा-कोरोनानंतर आता 'या' भयंकर आजाराचे संकट, चीनमध्ये हाय अलर्ट जारी

शास्त्रज्ञांनी WHOला सांगितले की, त्यांनी या विषयावर गांभीर्य दाखवावे आणि पुढील आठवड्यात हा पेपर एका विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित करावे. WHOच्या म्हणण्यानुसार कोरोनोचा आजार प्रामुख्याने एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे लहान ड्रॉपलेटद्वारे पसरतो, जो शिंका येणे किंवा बोलताना तोंडातून बाहेर पडतो.

वाचा-2500 रुपयांत मिळवा कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट! रुग्णालयाची धक्कादायक ऑफर

WHOला दावा अमान्य

या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की शिंका आल्यानंतर हवेत दूरपर्यंत मोठे ड्रॉपलेट किंवा लहान ड्रॉपलेट लोकांना संक्रमित करण्यास सक्षम असतात. ते बराच काळ बंद हवेत राहतात आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना संक्रमित करतात. मात्र WHOने न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संशोधकांनी दिलेला पुरावा पुरेसा नाही. न्यूयॉर्क टाईम्सला WHOने चे डॉ. बेनेडेटा अलेंगरन्झी म्हणाले, 'विशेषत: गेल्या दोन महिन्यांत आम्ही बर्‍याचदा असे म्हटले आहे की हा रोग हवेच्या माध्यमातून पसरतो यावर आम्ही विचार करीत आहोत पण हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत'. त्यामुळं आता जागतिक आरोग्य संघटना वैज्ञानिकांच्या या दाव्यावर काय प्रतिक्रीया देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

वाचा-आता 'या' राज्यात तब्बल 1 वर्ष पाळावे लागणार कोरोनाचे नियम

संपादन-प्रियांका गावडे.

First published: July 6, 2020, 9:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading