कोरोनाचा टाइम बॉम्ब निघाली 'ही' विमान कंपनी, पॉझिटिव्ह रुग्णांना घेऊन केला अनेक देशांमध्ये प्रवास

कोरोनाचा टाइम बॉम्ब निघाली 'ही' विमान कंपनी, पॉझिटिव्ह रुग्णांना घेऊन केला अनेक देशांमध्ये प्रवास

बंदीनंतरही पॉझिटिव्ह रुग्णांना प्रवास करत होती 'ही' विमान कंपनी, अनेक देशांमध्ये पसरला कोरोना.

  • Share this:

तेहरान, 07 मे : जगभरात कोरोनानं थैमान घातले आहे. यामुळं जवळजवळ सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थिती सर्व विमान सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तरी, इराणच्या एका विमान कंपनीने अनेक देशांत आपली सेवा सुरू ठेवली आहे. धक्क्दायक म्हणजे या कंपनीच्या विमानातून अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी प्रवास केला आहे. बीबीसी अरबी या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे.

या रिपोर्टनुसार, 31 जानेवारी रोजी इराणने विमानांना चीनमध्ये जाण्यासाठी किंवा चीनहून परत येण्यास बंदी घातली होती. परंतु इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला जोडलेली महान एअर या खासगी विमान कंपनीने अनेक आठवडे आपली सेवा सुरू ठेवली होती. यावेळी, महान एअरची विमाने चीन व इतर देशांमध्ये सेवा देत होती. बंदीनंतरही विमान उड्डाणे सुरू ठेवण्याबाबत या कंपनीनं सरकारशी खोटे बोलल्याचेही आता समोर आले आहे. इराणची राजधानी तेहरान आणि चीनच्या विमानतळाच्या डेटामध्ये महान एअरची विमाने मार्चपर्यंत उडत असल्याची माहिती मिळाली आहे.

वाचा-3 डॉक्टरांनी उचललं टोकाचं पाऊल, रुग्णालयाच्या खिडकीतून मारली उडी आणि...

6 फेब्रुवारीला महान एअरच्या एका विमानानं वुहानहून 70 इराणी विद्यार्थ्यांना आणले आणि त्याच दिवशी इराकला उड्डाण केले. महान एअरचा दावा आहे की 6 फेब्रुवारीच्या विमानानंतर चीनकडून सर्व उड्डाणे रद्द केली. परंतु Flightradar24 मधील आकडेवारीनुसार 23 फेब्रुवारीपर्यंत बेजींग, शांघाय आणि ग्वंगझू आणि शेन्झेन येथून आणखी 55 उड्डाणे होती. इराक आणि लेबेनॉनमध्ये कोरोना विषाणूची पहिली घटना महान एअरच्या उड्डाणांमधूनच समोर आली आहे. एअरलाइन्सची विमान चीनमधून तेहरानकडे उड्डाण करत असे, तर विमानाने बार्सिलोना, दुबई, क्वालालंपूर आणि इस्तंबूल येथे तर 24 तासांत उड्डाणे सुरू होती.

वाचा-मुंबईहून निघालेल्या ट्रेनमध्ये पोट भरण्यासाठी बेल्टनं मारहाण, वाचा काय घडलं

याआधी याच एअरलाइन्सच्या केबिन क्रूने पीपीई नसणे आणि विमानातील संक्रमण रोखण्याचा मुद्दा उपस्थित केला होता, परंतु त्यांना शांत करण्यात आले. त्याचवेळी महान एअरचे म्हणणे आहे की त्यांची विमानं ही मदतीसाठी चीनमध्ये जात होता. तेथे प्रवाशी उड्डाणं नव्हती. मात्र बीबीसीच्या रिपोर्टमध्ये ते प्रवाशांना घेऊन जात असल्याचं समोर आलं आहे.

वाचा-नितेश राणेंनी समोर आणला सायन हॉस्पिटलमधील धक्कादायक VIDEO,वार्डात मृतदेहच मृतदेह

First published: May 7, 2020, 1:05 PM IST

ताज्या बातम्या